PM Modi Birthday : रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Last Updated:

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मुकेश अंबानी यांनी शुभेच्छा दिल्या, भारताला महासत्ता बनवण्याचे कौतुक केले आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली.

News18
News18
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (17 सप्टेंबर) त्यांचा 75वा वाढदिवस साजरा करत आहेत. देशभरातून आणि जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उद्योगजगतामधील दिग्गज उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी देखील मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
मुकेश अंबानी म्हणाले, "आजचा दिवस 145 कोटी भारतीयांसाठी उत्सवाचा दिवस आहे. ईश्वराने स्वतः मोदीजींना अवतार पुरुष म्हणून आपल्या मातृभूमीचे नेतृत्व करण्यासाठी पाठवले आहे जेणेकरून भारत जगातील सर्वोत्तम राष्ट्र बनू शकेल."

दीर्घायुष्याची प्रार्थना

अंबानी पुढे म्हणाले, "हा काही योगायोग नाही की मोदीजींचा अमृत महोत्सव भारताच्या अमृतकाळात साजरा होत आहे. माझी प्रामाणिक इच्छा आहे की जेव्हा स्वतंत्र भारत 100 वर्षांचा होईल, तेव्हाही मोदीजी देशाची सेवा करत राहोत. जीवेत् शरदः शतम्, परम आदरणीय नरेंद्रभाई."
advertisement

"भारताला बनवत आहेत महासत्ता"

रिलायन्स चेअरमन यांनी मोदींना "भारत आणि भारतीयांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे नेते" असे संबोधले. त्यांनी सांगितले की मोदींनी प्रथम गुजरातला आर्थिक शक्ती बनवले आणि आता ते संपूर्ण भारताला जागतिक महासत्ता बनवत आहेत.
आपल्या शुभेच्छा देताना अंबानी म्हणाले, "मी संपूर्ण 145 कोटी भारतीय जनतेसोबत मिळून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या उत्तम आरोग्याची प्रार्थना करतो. जय श्रीकृष्ण, जय हिंद."
advertisement
(डिस्क्लेमर – नेटवर्क18 आणि TV18 कंपन्या चॅनेल/वेबसाईटचे संचालन करतात. या कंपन्यांचे नियंत्रण इंडिपेंडंट मीडिया ट्रस्टकडे आहे, ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज हा एकमेव लाभार्थी आहे.)
मराठी बातम्या/देश/
PM Modi Birthday : रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement