Mumbai Metro : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 3 लवकरच सुरु; कसे असतील तिकीट दर?

Last Updated:

Mumbai Metro 3 Ticket Price : मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे! कुलाबा ते आरेपर्यंत धावणारी मेट्रो-3 लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. उद्घाटनापूर्वीच तिकीट दर जाहीर झाले असून प्रवाशांना परवडणाऱ्या किमतीत प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

News18
News18
मुंबई : दक्षिण मुंबईतून उपनगरांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आता मोठी आनंदाची बातमी आहे. कुलाबा ते आरेपर्यंत धावणारी 33.5 किलोमीटर लांबीची मुंबई मेट्रो-3 (ॲक्वा लाईन) लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. या मेट्रोमार्गामुळे दररोज लाखो प्रवाशांना मोठा फायदा होणार असून शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होईल. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अर्थात म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो-3 लाईनचे उद्घाटन होणार आहे. पण, या मेट्रो प्रवासासाठी तिकीट दर किती असतील? चला जाणून घेऊया.
या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे आरे ते बीकेसी मार्ग 7 ऑक्टोबर 2025 रोजी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर बीकेसी ते वरळी हा भाग 9 मे 2025 पासून सुरू झाला. या दोन्ही टप्प्यांनंतर आता वरळी ते कफ परेड हा अंतिम टप्पा पूर्ण झाला असून तो सुरू झाल्यावर संपूर्ण कुलाबा ते आरे हा कॉरिडॉर प्रवाशांसाठी खुला होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपच्या अधिवेशनात ही घोषणा केली होती.
advertisement
ॲक्वा लाईन ही मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो आहे. संपूर्ण 33.5 किमीच्या मार्गावर एकूण 27 स्टेशन असतील. त्यापैकी तब्बल 26 स्टेशन भूमिगत असतील. अंतिम टप्प्यात 11 नवीन स्टेशन प्रवाशांसाठी खुले होणार आहेत. या मेट्रो मार्गामुळे प्रवाशांचा मौल्यवान वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. आजवर रस्त्याने कुलाबा ते आरे असा प्रवास करण्यास दोन ते तीन तासांचा कालावधी लागत असे. मात्र, आता हेच अंतर मेट्रो-3 मुळे फक्त एका तासात पूर्ण होईल. त्यामुळे दैनंदिन प्रवास सुलभ, जलद आणि आरामदायक होणार आहे.
advertisement
या प्रकल्पासाठी सुरक्षा तपासणी महत्त्वाची होती. मेट्रो रेल्वे सेफ्टी आयुक्तांनी अंतिम टप्प्याची तपासणी केली असून एप्रिलपासून या मार्गावर ट्रायल रन सुरू होते. सर्व आवश्यक सुरक्षा परवानग्या मिळाल्यानंतर आता प्रत्यक्षात उद्घाटनाची वेळ आली आहे.
प्रवाशांसाठी मोठी अपडेट; असे ठरले तिकिट दर
प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो-3 चे भाडेदर टप्प्याटप्प्याने निश्चित करण्यात आले आहेत. आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचे भाडे 10 रुपये ते 50 रुपये दरम्यान आहे. दुसऱ्या टप्प्यात, म्हणजे आरे ते आचार्य अत्रे मार्गासाठी भाडे 60 रुपयांपर्यंत आहे. तर संपूर्ण आरे ते कुलाबा या कॉरिडॉरसाठी जास्तीत जास्त भाडे 70 रुपये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना खिशाला परवडेल अशा दरात जलद प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे.
advertisement
मुंबईकरांसाठी ही मेट्रो-3 ॲक्वा लाईन म्हणजे वाहतुकीच्या समस्येवर मोठा दिलासा आहे. दैनंदिन प्रवासाचा वेळ वाचल्यामुळे प्रवाशांना मोठा आराम मिळणार आहे. दक्षिण मुंबईपासून उपनगरांपर्यंत प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या मेट्रो मार्गामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडणार आ
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 3 लवकरच सुरु; कसे असतील तिकीट दर?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement