advertisement

Shocking Incident : सकाळी फेरफटका मारायला गेले, वडिलांसोबत घडलं भयंकर, पत्नी अन् मुलीच्या किंकाळ्यांनी कळवा हादरलं

Last Updated:

Kalwa Crime News : कलवा परिसरात कुटुंबियांसोबत फेरफटका गेलेल्या एका व्यक्तीसोबत अनर्थ घडला आहे. ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरुन गेला असून सध्या या घटनेचा पोलिस तपास सुरु झाला आहे.

Thane crime news gold chain theft case
Thane crime news gold chain theft case
ठाणे : ठाणे शहरात सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कळवा परिसरात असाच एक प्रकार समोर आला असून पत्नी आणि मुलीसह संध्याकाळी फेरफटका मारत असलेल्या एका व्यावसायिकाला चोरट्यांनी लक्ष्य केले.
कळव्यात कुटुंबासमोरच मोठा अनर्थ
कळवा येथे राहणारे मुकेश भोसले (वय 56) हे आपल्या कुटुंबासोबत घराजवळील परिसरात फिरत होते. याच दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी अचानक त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून पळ काढला. चोरट्यांनी चेहऱ्यावर हेल्मेट घातले असल्याने त्यांची ओळख होऊ शकली नाही.
या घटनेमुळे भोसले कुटुंबीय हादरून गेले. परिसरातील नागरिकांनी तात्काळ कळवा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
advertisement
चोरट्यांनी हिसकावलेली सोनसाखळी सुमारे एक लाख रुपयांची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे अशी माहिती कळवा पोलिसांनी दिली.
सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी पोलिसांचे आवाहन
शहरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी तसेच मौल्यवान दागिने घालून सार्वजनिक ठिकाणी फिरताना सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Shocking Incident : सकाळी फेरफटका मारायला गेले, वडिलांसोबत घडलं भयंकर, पत्नी अन् मुलीच्या किंकाळ्यांनी कळवा हादरलं
Next Article
advertisement
Parth Pawar Land Scam: सरकारच्या चौकशीत पार्थ पवारांना क्लीन चीट, मग दोषी कोण? मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट
सरकारच्या चौकशीत पार्थ पवारांना क्लीन चीट, मग दोषी कोण? मुंढवा जमीन गैरव्यवहार प
  • मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातील खारगे समितीच्या अहवालातील काही मुद्दे समोर आले आहे

  • दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला

  • खारगे समितीच्या अहवालातही पार्थ पवारांना 'क्लीन चिट' मिळाल्याचे जवळपास स्पष्ट

View All
advertisement