धुराट अहिराणी बोलस ना भो तू तर! मृणाल ठाकूरचा VIDEO पाहून चाहते चाट; पुन्हा पुन्हा पाहतायेत
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mrunal Thakur Speaking Ahirani : मृणाल ठाकूरला व्हिडीओत एक पत्रकार प्रश्न विचारायला जाते. तेव्हा मृणाल ठाकूर आपल्याला अहिराणी येत असल्याचं अहिराणी भाषेत सांगते. तेव्हा पत्रकारही तिला अहिराणी भाषेतच प्रश्न विचारते आणि मृणाल त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अहिराणीत देते
अभिनेत्री मृणाल ठाकूर जिने बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे. दोन्ही फिल्म इंडस्ट्री तिने चांगल्याच गाजवल्या आहे. पण मूळची मराठी असलेली मृणाल ठाकूर आपली मराठी मातीतील भाषा विसरली नाही. नुकत्याच एका कार्यक्रमात मृणाल ठाकूर खूप सुंदर अहिराणी बोलताना दिसली आहे. तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होतो आहे.
मृणाल ठाकूर जिने 'कुमकुम भाग्य' या मालिकेपासून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर हिंदी, तेलगू आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करत तिथंही आपलं स्थान निर्माण केलं आहे. ती धुळ्यातील आहे, जिचा जन्म धुळ्याचा. मराठी भाषेतील पोटभाषा अहिराणी. जी खान्देशची मायबोली. जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिकच्या काही भागांमध्ये अहिराणी भाषा बोलली जाते. त्यामुळे धुळ्याच्या असेलल्या मृणालला अहिराणी खूप छान येतं. इतर भाषांच्या फिल्ममध्ये काम केलं तरी ती आपली मायबोली अहिराणी विसरली नाही.
advertisement
मृणाल ठाकूरला व्हिडीओत एक पत्रकार प्रश्न विचारायला जाते. तेव्हा मृणाल ठाकूर आपल्याला अहिराणी येत असल्याचं अहिराणी भाषेत सांगते. तेव्हा पत्रकारही तिला अहिराणी भाषेतच प्रश्न विचारते आणि मृणाल त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अहिराणीत देते. यामध्ये ती तिच्या आवडीचे पदार्थही सांगते.
advertisement
अहिराणी आता या भाषेचं वेड फक्त खान्देशापुरता मर्यादित नाही तर राज्य आणि राज्याच्या बाहेरही गेलं आहे. याचं कारण म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियावर तुम्हाला बरीच अहिराणी गाणी पाहायला मिळतील. जी कमी कालावधीतच लोकप्रिय झाली. कित्येक लग्नांमध्येही, हळदीला, वरातीत ही गाणी वाजतात. देख तुनी बायको, हाय झुमका वाली पोर ही गाणी तुम्ही ऐकलीच आहेत, हीच अहिराणी भाषा.
advertisement
अहिराणी भाषेतील ही गाणी तुम्हाला आवडलीच असतील ना, आता मृणाल ठाकूरचा हा अहिराणी भाषेतील संवाद आवडला की नाही? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अहिराणी भाषेतच मृणालचं कौतुक केलात तर अधिकच चांगलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 10:26 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
धुराट अहिराणी बोलस ना भो तू तर! मृणाल ठाकूरचा VIDEO पाहून चाहते चाट; पुन्हा पुन्हा पाहतायेत








