advertisement

अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र कसं काढायचे? पात्रता, सरकारकडून मिळणारे फायदे कोणते?

Last Updated:

Agriculture News : देशातील मोठा वर्ग आजही शेतीवर अवलंबून आहे. भारताला कृषीप्रधान देश म्हटले जाते आणि कोरोना काळात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Agriculture News
Agriculture News
मुंबई : देशातील मोठा वर्ग आजही शेतीवर अवलंबून आहे. भारताला कृषीप्रधान देश म्हटले जाते आणि कोरोना काळात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. त्या कठीण काळात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषी व कृषीपूरक व्यवसायांमुळे टिकून राहिली होती. केंद्र आणि राज्य सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या अनेक योजना या विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असतात. मात्र या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे अल्पभूधारक शेतकरी असल्याचे अधिकृत प्रमाणपत्र असणे अत्यावश्यक ठरते.
अल्पभूधारक शेतकरी म्हणजे कोण?
ज्या शेतकऱ्यांकडे ५ एकरांपेक्षा कमी शेती जमीन आहे, त्यांना अल्पभूधारक शेतकरी म्हणून ओळखले जाते. अशा शेतकऱ्यांना शासनाकडून विविध सवलती, अनुदान योजना, कर्जसवलत, पीक विमा आणि आर्थिक मदतीचा लाभ दिला जातो. त्यामुळे हे प्रमाणपत्र केवळ कागदपत्र नसून शेतकऱ्यांसाठी अनेक संधींची किल्ली ठरते.
अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र कुठे मिळते?
अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र शेतकरी तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रामार्फत मिळवू शकतात. याशिवाय महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ या ऑनलाइन पोर्टलवरूनही हे प्रमाणपत्र सहजपणे मिळवता येते. शेतकऱ्यांना जो पर्याय सोयीचा वाटेल, त्या पद्धतीने अर्ज करता येतो. ऑनलाइन अर्जासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in
advertisement
या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागते.
आवश्यक कागदपत्रांची यादी
प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात. ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा शासनाने दिलेले इतर ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र आवश्यक असते.
पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, वीज बिल, पाणी बिल, घरफाळा पावती, सातबारा किंवा ८-अ उतारा सादर करता येतो.
advertisement
जमीन आणि महसूल संदर्भातील कागदपत्रे
अल्पभूधारक शेतकरी असल्याचे सिद्ध करण्यासाठी जमिनीचा सातबारा उतारा किंवा ८-अ उतारा अनिवार्य आहे. तसेच संबंधित तलाठ्यांचा अहवालही आवश्यक असतो. याशिवाय शेतकऱ्याने स्वतः भरलेले स्वयंस्वीकृती (स्वयंघोषणा) पत्र अर्जासोबत जोडावे लागते. हे स्वंयघोषणापत्र सर्व अर्जदारांसाठी बंधनकारक आहे.
आपले सरकार पोर्टलवर अर्ज कसा कराल?
आपले सरकार पोर्टलवर प्रथम नवीन वापरकर्ता नोंदणी करावी लागते. त्यासाठी नाव, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीची नोंद करून लॉगिन तयार करावे. लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्डवर महसूल विभाग निवडावा. त्यानंतर महसूल सेवा या पर्यायातून ‘अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र’ ही सेवा निवडावी.
advertisement
अर्ज भरताना घ्यायची काळजी
अर्ज करताना वैयक्तिक माहिती, पत्ता आणि किती वर्षांपासून त्या पत्त्यावर वास्तव आहे, याची माहिती अचूक भरावी लागते. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात. ही कागदपत्रे साधारणपणे ७५ केबी ते ५०० केबीच्या आकारमानात असावीत. फोटो आणि सही देखील अपलोड करणे आवश्यक आहे. सर्व माहिती भरल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरावे लागते आणि मिळणारी पावती जतन करून ठेवावी.
advertisement
१५ दिवसांत मिळते प्रमाणपत्र
ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज सादर केल्यानंतर साधारणपणे १५ दिवसांच्या आत अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र मिळते. जर काही कारणाने या कालावधीत प्रमाणपत्र मिळाले नाही, तर १५ दिवसांनंतर आपले सरकार पोर्टलवर लॉगिन करून अपील अर्ज सादर करता येतो. योग्य कागदपत्रांसह अर्ज केल्यास शेतकऱ्यांना हे प्रमाणपत्र सहजपणे प्राप्त होते.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र कसं काढायचे? पात्रता, सरकारकडून मिळणारे फायदे कोणते?
Next Article
advertisement
Parth Pawar Land Scam: सरकारच्या चौकशीत पार्थ पवारांना क्लीन चीट, मग दोषी कोण? मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट
सरकारच्या चौकशीत पार्थ पवारांना क्लीन चीट, मग दोषी कोण? मुंढवा जमीन गैरव्यवहार प
  • मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातील खारगे समितीच्या अहवालातील काही मुद्दे समोर आले आहे

  • दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला

  • खारगे समितीच्या अहवालातही पार्थ पवारांना 'क्लीन चिट' मिळाल्याचे जवळपास स्पष्ट

View All
advertisement