Salman Khan: 'तो भिंतीवर डोकं आपटायचा', सलमान ऐश्वर्याच्या प्रेमात झालेला वेडा? शेजाऱ्याचा शॉकिंग खुलासा
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Salman Khan: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि लेडी सुपरस्टार ऐश्वर्या राय बच्चन यांची प्रेमकहाणी 90 च्या दशकात खूप गाजली.
मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि लेडी सुपरस्टार ऐश्वर्या राय बच्चन यांची प्रेमकहाणी 90 च्या दशकात खूप गाजली. "हम दिल दे चुके सनम" या चित्रपटाच्या सेटवर दोघांची जवळीक सुरू झाली. सुरुवातीला ही कहाणी परीकथेसारखी वाटली, पण हळूहळू ती वादळी झाली. नुकत्याच एका मुलाखतीत सलमानच्या शेजाऱ्याने सांगितलं तो ऐश्वर्या रायच्या प्रेमात किती वेडा होता?
प्रसिद्ध दिग्दर्शक प्रल्हाद कक्कर, जे त्या काळी सलमान खानच्या शेजारी राहत होते, त्यांनी अलीकडे एका मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले. ते म्हणाले की, "सलमानचे ऐश्वर्यावरील प्रेम हे वेड्यासारखं होतं. तो तिच्यावर खूप अधिकार गाजवत असे. तो इमारतीच्या प्रवेशद्वारात मोठा गोंधळ घालायचा. भिंतीवर आपले डोके आपटायचा. हे नाते संपण्याआधीच संपल्यासारखे झाले होते."
advertisement
ऐश्वर्याच्या पालकांसाठी हा ब्रेकअप दिलासा होता, कारण त्यांना तिच्या सुरक्षेची चिंता होती. मात्र, या नात्याच्या तुटण्यामुळे ऐश्वर्याच्या भावनांवर आणि करिअरवर खोल परिणाम झाला. इंडस्ट्रीतील अनेकांनी सलमानची बाजू घेतली, पण ऐश्वर्याला कुणी साथ दिली नाही. त्यामुळे तिचा चित्रपटसृष्टीवरील विश्वास ढळला.
advertisement
ब्रेकअपनंतर ऐश्वर्याचे नाव अभिनेता विवेक ओबेरॉय सोबत जोडले गेले. विवेकने तर एकदा पत्रकार परिषद घेऊन सलमानवर गंभीर आरोप केले होते. त्याने सांगितले होते की सलमानने त्याला धमक्या दिल्या आणि शिवीगाळ केली. या घटनेनंतर ऐश्वर्याने मात्र कधीही स्वतःहून बोलणे पसंत केले नाही.
आज ऐश्वर्या राय बच्चन एक आदर्श पत्नी आणि आई म्हणून ओळखली जाते. तिने अभिषेक बच्चनसोबत लग्न करून आपले आयुष्य नव्या वाटेवर नेले. मात्र, सलमान-ऐश्वर्याची ही प्रेमकहाणी अजूनही बॉलिवूडमधील सर्वात गाजलेल्या कहाण्यांपैकी एक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 12:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Salman Khan: 'तो भिंतीवर डोकं आपटायचा', सलमान ऐश्वर्याच्या प्रेमात झालेला वेडा? शेजाऱ्याचा शॉकिंग खुलासा