Asia Cup 2025 : पाकड्यांनी पैशांसमोर ईमान विकलं! 141 कोटींची डील फसणार की पाकिस्तान हट्ट सोडणार? PCB समोर नवा पेच
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pakistan Cricket Board : जर पाकिस्तानने खरोखरच स्पर्धेतून माघार घेतली, तर त्यांना मोठे आर्थिक नुकसान होऊ शकतं. अशातच आता पाकिस्तानने आपलं ईमान विकल्याचं समजतंय.
Pakistan pull out From Asia Cup 2025 : टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध हँडशेक न करण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानला मिर्च्या झोंबल्या आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अँडी पायक्रॉफ्ट यांना मॅच रेफरीच्या पॅनेलमधून हटवले नाही, तर आशिया कप (Asia Cup 2025) मधून माघार घेण्याची धमकी दिली होती. पण आयसीसीने (ICC) ही विनंती फेटाळून लावली आहे. जर पाकिस्तानने खरोखरच स्पर्धेतून माघार घेतली, तर त्यांना मोठे आर्थिक नुकसान होऊ शकतं. अशातच आता पाकिस्तानने आपलं ईमान विकल्याचं समजतंय.
141 कोटी रुपयांपर्यंत महसूल
पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार, पाकिस्तानने जर आशिया कपमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला तर या निर्णयामुळे पीसीबीला 12 ते 16 मिलियन डॉलर म्हणजेत 141 कोटी रुपयांपर्यंत महसूल गमवावा लागणार आहे. म्हणजेच आता मोहसिन नक्वी यांना गप्प खाली मान घालून खेळावं लागणार आहे. जी पाकिस्तानसाठी खूप मोठी रक्कम आहे.
advertisement
मोहसिन नक्वी धोका पत्करतील का?
मोहसिन नक्वी त्यांच्या 227 मिलियन डॉलरच्या वार्षिक बजेटपैकी 16 मिलियन डॉलरचे नुकसान होण्याचा धोका पत्करतील का? हे त्यांच्या एकूण वार्षिक महसुलाच्या सुमारे 7 टक्के आहे. त्यांच्यासाठी हा एक मोठा जुगार ठरू शकतो. पण पाकिस्तानचे महत्त्वाचे मंत्री असल्याने त्यांना आपल्या देशातील लोकांसमोर आपली प्रतिष्ठा जपण्याचीही गरज आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
advertisement
आशियाई क्रिकेट काऊंसिल
दरम्यान, आशियाई क्रिकेट काऊंसिलच्या (ACC) वार्षिक महसुलापैकी 75 टक्के महसूल भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या पाच टेस्ट मॅच खेळणाऱ्या देशांना मिळतो. प्रत्येक देशाला 15 टक्के वाटा मिळतो. उर्वरित 25 टक्के महसूल असोसिएट देशांमध्ये वाटला जातो. यामध्ये ब्रॉडकास्ट डील, स्पॉन्सरशिप आणि तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलाचा समावेश असतो. त्यामुळे पाकिस्तान नक्कीच पैशांसाठी आपलं ईमान विकेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 11:53 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup 2025 : पाकड्यांनी पैशांसमोर ईमान विकलं! 141 कोटींची डील फसणार की पाकिस्तान हट्ट सोडणार? PCB समोर नवा पेच