Rekha : नेहमीच अफेअर, सौंदर्यामुळे चर्चेत असणाऱ्या रेखा बद्दलच्या 'या' आठ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rekha : बॉलिवूड अभिनेत्री रेखाची गणना इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांमध्ये केली जाते. पण रेखा बद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
Rekha : बॉलिवूड अभिनेत्री रेखाने आपल्या सौंदर्याने, अभिनयाने आणि व्यक्तीमत्त्वाने चाहत्यांना भूरळ घातली आहे. 10 ऑक्टोबर 1954 मध्ये जन्मलेल्या रेखाने 70-80 च्या दशकात आपल्या अदांनी चाहत्यांच्या हृदयावर राज्य केलं. आजही अभिनेत्री तितकीच लोकप्रिय आहे. रेखाला 'टाइमलेस ब्युटी' असेही म्हटले जाते. बॉलिवूडवर अभिनेत्रीने अनेक वर्ष राज्य केलं आहे. आजही चाहते रेखाही एक अदा पाहण्यासाठी वेडे होत असतात. पण रेखाबद्दलच्या या आठ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
रेखाचं खरं नाव
रेखाचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 मध्ये झाला. रेखाचे आई-वडिल दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील स्टार होते. रेखाच्या आईचे नाव पुष्पावली तर वडिलांच्या नावाचे नाव जॅमिनी गणेशन आहे. रेखाचे खरे नाव भानुमती रेखा गणेशन असं आहे. पण सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर रेखाने आपलं नाव बदललं.
advertisement
रेखाचा पहिला चित्रपट!
रेखाचे आई-वडिल दाक्षिणात्य चित्रपटांत काम करायचे. तिचे वडील तामिळ अभिनेते होते. तर आई तेलुगू अभिनेत्री होती. रेखाचा आपल्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट हा तेलुगू होता. 'रंगुला रत्नम' असे या चित्रपटाचे नाव. त्यावेळी रेखा बालकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती.
रेखाला हिंदीची अडचण
रेखा मुळची साऊथची. तिचे बालपण साऊथमध्ये गेले. त्यामुळे रेखाला हिंदीची खूप अडचण होती. ज्यावेळी रेखाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी तिला हिंदी येत नव्हतं. हिंदी शिकण्यासाठी रेखाला खूप मेहनत करावी लागली. पण आता रेखा उत्तम हिंदी बोलते.
advertisement
रेखाकडे सिल्कच्या साड्यांचं कलेक्शन
रेखाला कांजीवरम सिल्क साड्या खूप आवडतात. या साड्यांचं तिच्याकडे मोठं कलेक्शन आहे. एकदा नेसलेली साडी रेखा पुन्हा नेसत नाहीत. रेखाच्या साडी लूकने चाहत्यांना भूरळ घालते.
रेखाला चित्रकलेची आवड
फावल्या वेळात रेखाला चित्र काढायला आणि ती रंगवायला आवडतं. आपल्या भावना पेपरवर उतरवायला तिला आवडतं. चित्र काढणे ही रेखासाठी थेरेपी आहे. तसेच कवितांचीही रेखाला आवड आहे. फावल्या वेळात कविता करायला रेखाला आवडतं.
advertisement
रेखाला म्हणायचे डाकलिंग
करिअरच्या सुरुवातीला रेखा आजसारखी सुंदर नव्हती दिसत. वाढलेलं वजन आणि सावल्या रंगामुळे तिला डाकलिंग म्हणून हिणवलं जायचं. अनेक लोक रेखाची मजा घ्यायचे.
रेखाचं प्रेम अन् लग्न
रेखाचं करिअर शिखरावर असताना तिचं नाव अमिताभ बच्चन, राज बब्बर, विनोद मेहरा, अक्षय कुमार यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. अखेर काही काळाने रेखा मुकेश अग्रवालसोबत लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर सातच महिन्यात रेखाने आत्महत्या करत आयुष्य संपवलं. त्यानंतर रेखाने दुसरं लग्न केलं नाही.
advertisement
रेखाला विंटेज कारची आवड
रेखाला विंटेज कारची आवड आहे. रेखाकडे अनेक जुन्या आणि क्लासिक कार आहेत. या कारची काळजी घेताना रेखा दिसून येते. तसेच अभिनेत्रीला वाचनाचीदेखील आवड आहे. त्यांच्या घरी एक मोठी लायब्ररी आहे. कामाच्यामध्ये रेखा पुस्तक वाचत असते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 4:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rekha : नेहमीच अफेअर, सौंदर्यामुळे चर्चेत असणाऱ्या रेखा बद्दलच्या 'या' आठ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?