Prajakta Mali Income Source : 'मी पैसे कमावण्यासाठी चित्रपट करत नाही', मग प्राजक्ता माळीचा इनकम सोर्स आहे तरी काय?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी पैसे कमावण्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' करत असल्याचं म्हणाली आहे.
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) मराठी मनोरंजनसृष्टीतील एक उत्तम अभिनेत्री आहे. आपल्या दमदार अभिनयाने तिने छोट्या पडद्यासह रुपेरी पडदा गाजवला आहे. आज 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या बहुचर्चित कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' होस्ट करताना अभिनेत्रीचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळतो. आजवर तिने अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. अशातच अभिनेत्रीने केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. राजश्रीला दिलेल्या मुलाखतीत "मी पैसे कमावण्यासाठी चित्रपट करत नाही", असं अभिनेत्री म्हणाली आहे.
प्राजक्ता माळी म्हणाली,"चांगलं काम करण्यासाठीच माझा स्ट्रगल सुरू आहे. चांगल्या कामामुळे मी केलेल्या चित्रपटांपेक्षा रिजेक्ट केलेल्या चित्रपटांची संख्या जास्त आहे. जर एखाद्या चित्रपटात काहीच नसेल तर नुसतचं आपल्याला एक चित्रपट करण्याचं समाधान मला नकोय. माझी सवय आहे की, एखादा हिरो किंवा हिरोईन आवडली की मी त्यांचे सगळे चित्रपट जाऊन बघते".
advertisement
प्राजक्ता पुढे म्हणाली,"मला असं वाटतं की, माझ्यासारखंच माझ्या चाहत्याने केलं तर... काय तुकार काम केलंय अशा चाहत्यांनी कमेंट्स केलेल्या मला नको आहेत. पैसे कमावण्यासाठी चित्रपट करायचे नाहीत हे माझं ठरलंय. पैसे कमावण्यासाठी 'हास्यजत्रा' करतेय. मग आता बाकी पैशांसाठी काही करायचं नाही. उत्तम काम करण्यासाठीचा हा स्ट्रगल आहे. प्राजक्ता माळीचा स्वत:चा फार्महाऊस आहे. एका आलिशान फार्म हाऊसची प्राजक्ता मालकीन आहे. तसेच तिला स्वता:चा 'प्राजक्ताराज' नावाचा दागिण्यांचा व्यवसाय आहे.
advertisement
advertisement
प्राजक्ता माळी मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री, निर्माती आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक चित्रपट, मालिका आणि वेबसीरिजमध्ये तिने दमदार काम केलंय. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेच्या माध्यमातून प्राजक्ता घराघरांत पोहोचली. 'खो-खो', 'रणांगण', 'गांधी, माय फादर' आणि 'हंपी' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 3:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Prajakta Mali Income Source : 'मी पैसे कमावण्यासाठी चित्रपट करत नाही', मग प्राजक्ता माळीचा इनकम सोर्स आहे तरी काय?