'कोल्हापूर चप्पल' आता 'मेक इन वुमन'! महिला बचत गटांना मिळणार 1.5 कोटींचा निधी, शासनाचा मोठा निर्णय

Last Updated:

Kolhapur Chappal : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कोल्हापूर चप्पल उद्योगात मोठा प्रकल्प उभारला जाणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) येत्या दोन महिन्यांत...

Kolhapur Chappal
Kolhapur Chappal
Kolhapur Chappal : महिला बचत गटांना बळ देण्यासाठी येत्या दोन महिन्यांत 1.5 कोटी रुपये खर्च करून 'कोल्हापूर चप्पल बांधणी' प्रकल्प उभा केला जाणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पासह, 2025-26 या आर्थिक वर्षात महिला बचत गटांना 53 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून महिलांचे कौतुक
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी 'माविम'च्या वार्षिक सभेत बोलताना, महिलांना कुटुंबाचा आर्थिक कणा म्हटले. त्यांच्या आर्थिक शिस्तीमुळे कुटुंबाची प्रगती होत असल्याचे त्यांनी सांगितले. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात 'स्वस्थ नारी – सशक्त परिवार' अभियान राबवले जात असून, महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. महिलांची केवळ आर्थिकच नव्हे, तर सर्वांगीण प्रगती व्हायला हवी, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
advertisement
गुणवंत महिलांचा सन्मान
कार्यक्रमात जिल्हाधिकारी येडगे यांच्या हस्ते अनेक महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये दत्त, ओम साई महिला बचत गट, उद्योजिका शिवानी पाटील, दहावीत 96 टक्के गुण मिळवणारी विद्यार्थिनी समीक्षा पाटील आणि सांगरूळ येथील कोल्हापूर चप्पल बनवणाऱ्या महिला बचत गटाचा विशेष गौरव करण्यात आला.
'माविम'चे कार्य
'अस्मिता लोकसंचालित साधन केंद्र, बालिंगा' या केंद्राशी 400 हून अधिक महिला बचत गट आणि 5 हजारांपेक्षा जास्त महिला सदस्य जोडलेल्या आहेत. या संस्थेने आतापर्यंत 6 कोटी 16 लाख रुपयांपेक्षा जास्त बचत केली आहे. महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांना उपजीविकेचे शाश्वत साधन उपलब्ध करून देणे आणि लिंगभेद नष्ट करणे हे 'माविम'चे मुख्य उद्दिष्ट आहे.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'कोल्हापूर चप्पल' आता 'मेक इन वुमन'! महिला बचत गटांना मिळणार 1.5 कोटींचा निधी, शासनाचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement