मोठी बातमी! जगाच्या नकाशावर चमकणार 'महाबळेश्वर-पाचगणी', युनेस्को 'त्या' यादीत मिळालं मानाचं स्थान!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Satara News : महाराष्ट्राची शान आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. युनेस्कोने...
Satara News : महाराष्ट्राची शान आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. युनेस्कोने (UNESCO) या दोन्ही निसर्गरम्य स्थळांना 'नैसर्गिक वारसा स्थळांच्या' तात्पुरत्या यादीत स्थान दिले आहे. या निर्णयामुळे ही स्थळे आता जागतिक नकाशावर चमकणार असून, त्यांच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी दारे उघडली आहेत.
नैसर्गिक खजिन्याला जागतिक महत्त्व
महाबळेश्वर-पाचगणीचा परिसर केवळ थंड हवेसाठीच नव्हे, तर तो जैवविविधतेने आणि भूगर्भीय आश्चर्यांनी भरलेला आहे. येथे प्राणी आणि पक्ष्यांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती आढळतात. इतकेच नाही, तर हा प्रदेश 'फ्लड बॅसॉल्ट' ज्वालामुखीच्या अभ्यासासाठी एक आदर्श ठिकाण मानला जातो. विशेष म्हणजे, '‘क्रेटेशसइपेलिओजिन वंशविनाश’ या महाविनाश घटनेशी या भूभागाचा थेट संबंध असल्याचे अभ्यासक मानतात, ज्यामुळे या स्थळाला जागतिक स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
advertisement
पश्चिम घाटातील वारसा स्थळांमध्ये भर
युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्याने महाबळेश्वर आणि पाचगणी आता पश्चिम घाटातील इतर प्रतिष्ठित वारसा स्थळांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत. याआधीच महाराष्ट्रातील राधानगरी अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना अभयारण्य आणि कास पठार यांना हा जागतिक दर्जा मिळाला आहे. या निर्णयामुळे या दोन्ही पर्यटनस्थळांच्या पर्यावरण आणि जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत.
advertisement
हे ही वाचा : Mumbai Metro: भुयारी मेट्रोची पहिली धाव 35 मिनिटे लवकर, रोज 10 हजार प्रवाशांना होणार फायदा, कसा?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 2:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी! जगाच्या नकाशावर चमकणार 'महाबळेश्वर-पाचगणी', युनेस्को 'त्या' यादीत मिळालं मानाचं स्थान!