Mumbai Metro: भुयारी मेट्रोची पहिली धाव 35 मिनिटे लवकर, रोज 10 हजार प्रवाशांना होणार फायदा, कसा?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai Metro: विशेष म्हणजे मेट्रो 3 ही देशातील सर्वाधिक लांबीची व राज्यातील 100 टक्के भूमिगत मेट्रो मार्गिका आहे. आता 10 हजार अतिरिक्त प्रवाशांना या मेट्रो सेवेचा फायदा होणार आहे.
मुंबई: मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरीण ताण मुंबई मेट्रोमुळे काहीसा कमी होत असल्याचे चित्र आहे. आता मुंबईकरांच्या सोयीसाठी मेट्रोने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. बहुचर्चित भुयारी मेट्रो 3 ची धाव आता आणखी लवकर धावणार आहे. या मार्गिकेवरील सकाळची पहिली गाडी आता 35 मिनिटे लवकर धावणार असून त्यामुळे चार फेऱ्या जादा होतील. तर याचा आणखी 10 हजार प्रवाशांना फायदा होणार आहे.
मुंबईत बहुचर्चित मेट्रो 3 ही आरे जेव्हीएलआर -सीप्झ-विमानतळ-बीकेसी- दादर आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) अशी धावते. विशेष म्हणजे ही देशातील सर्वाधिक लांबीची व राज्यातील 100 टक्के भूमिगत मेट्रो मार्गिका आहे. या मार्गिकेचा पहिला टप्पा 7 ऑक्टोबर 2024 व दुसरा टप्पा 9 मे 2025 रोजी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला. सुरुवातीला सकाळी 8 ते रात्री 10.30 वाजेपर्यंत सुरू असणारी मेट्रो सध्या सकाळी 6.30 ते रात्री 11 दरम्यान धावत आहे.
advertisement
35 मिनिटे लवकर सुरू होणार
मेट्रो 3 ची सेवा आता 35 मिनिटे आधी सुरू होणार आहे. याबाबत मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसी) माहिती दिली आहे. आता पहिली गाडी आरे जेव्हीएलआर व आचार्य अत्रे चौक, या दोन्ही टोकांकडून सकाळी 6.30 वाजता ऐवजी 5.55 वाजता रवाना होईल. तर, रात्रीची शेवटची गाडी दोन्हीकडून 10.30 वाजता निघेल.
advertisement
दरम्यान, मुंबई मेट्रो 3 च्या या नव्या वेळांमुळे सकाळी 35 मिनिटांत प्रत्येकी 8 डब्यांच्या चार गाड्या अतिरिक्त धावतील. या एका गाडीची क्षमता 2500 प्रवासी असून त्यामुळे आणखी 10 हजार प्रवासी प्रवास करू शकतील. सध्या या मार्गिकेवरून दररोज अपेक्षित दोन लाख प्रवाशांऐवजी सरासरी 50 हजार प्रवासी ये-जा करीत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 2:02 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro: भुयारी मेट्रोची पहिली धाव 35 मिनिटे लवकर, रोज 10 हजार प्रवाशांना होणार फायदा, कसा?