advertisement

अरबी समुद्रात युद्धाची ठिणगी पडली, इराणकडून युद्धनौकेवर हल्ल्याचा प्रयत्न; हायटेक ड्रोनचे अमेरिकन फायटर जेटने केले तुकडे

Last Updated:

US shot down Iranian Drone: अरबी समुद्रात अमेरिकेने USS अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेच्या दिशेने येणारा इराणी ड्रोन हवेतच पाडल्याने अमेरिका–इराण तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे. याचवेळी हॉर्मुझ सामुद्रधुनीत तेलवाहू टँकरला रोखण्याचा प्रयत्न झाल्याने जागतिक सुरक्षेची चिंता वाढली आहे.

News18
News18
वॉशिंग्टन / अरबी समुद्र: अरबी समुद्रात अमेरिकन नौदलाच्या USS अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेच्या दिशेने येणारा इराणी ड्रोन अमेरिकेने पाडल्याची माहिती समोर आली आहे. रॉयटर्सला एका अमेरिकी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणचा शाहेद-139 ड्रोन विमानवाहू जहाजाच्या जवळ येत असताना F-35 फायटर जेटने तो हवेतच नष्ट केला.
ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा वॉशिंग्टन आणि तेहरानमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचलेला आहे. याच दरम्यान, हॉर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकन लष्करासाठी इंधन वाहतूक करणाऱ्या एका तेलवाहू टँकरला लहान, सशस्त्र बोटींकडून रेडिओवरून थांबण्याचे संकेत देण्यात आले.
अमेरिकन ध्वजाखालील स्टेना इम्पेरेटिव्ह (Stena Imperative) हा टँकर इराणच्या किनाऱ्याजवळील सामुद्रधुनीतून जात असताना संपर्क साधण्यात आला होता. मात्र, अहवालांनुसार टँकरने मार्ग बदलला नाही आणि नियोजित मार्गावरच पुढे गेला.
advertisement
दुसरीकडे, इराणी माध्यमांनी वेगळाच दावा केला आहे. इराणच्या नौदलाने आवश्यक कायदेशीर कागदपत्रे सादर न करणाऱ्या एका जहाजाला इराणी सागरी हद्द सोडण्याचा इशारा दिला होता, असे अर्धसरकारी फार्स न्यूजने म्हटले आहे. इशारा मिळताच संबंधित जहाज तात्काळ त्या भागातून बाहेर पडल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे.
ही घटना हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या इनबाउंड सागरी मार्गात घडल्याचे ब्रिटनच्या प्रादेशिक नौदल समन्वय यंत्रणेने आधीच नोंदवले होते. ही सामुद्रधुनी फारच अरुंद असून, पर्शियन आखातात ये-जा करणाऱ्या जहाजांसाठी ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जगातील सुमारे 25 टक्के समुद्री तेल व्यापार याच मार्गाने होतो.
advertisement
इराण यापूर्वीही आपल्या किनाऱ्याजवळून जाणाऱ्या जहाजांना त्रास देणे किंवा ताब्यात घेण्याच्या घटनांमध्ये सहभागी राहिला आहे. गेल्या वर्षी टालारा नावाच्या एका जहाजाला इराणी पाण्यात वळवून त्यावरील माल उतरवण्यात आला होता आणि नंतर जहाज सोडण्यात आले होते. नुकतेच, जगातील सर्वात मोठा टँकर ताफा असलेल्या ग्रीसनेही आपल्या जहाजांना या सामुद्रधुनीतून जाताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
दरम्यान, अमेरिका-इराण तणाव आणखी वाढताना दिसत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात इराणवर नव्या हल्ल्याची धमकी दिली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये नव्या अणुकरारावर चर्चा लवकरच होण्याची शक्यता असल्याचेही संकेत त्यांनी दिले आहेत.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
अरबी समुद्रात युद्धाची ठिणगी पडली, इराणकडून युद्धनौकेवर हल्ल्याचा प्रयत्न; हायटेक ड्रोनचे अमेरिकन फायटर जेटने केले तुकडे
Next Article
advertisement
GK Quiz: गोव्यापेक्षा पाच पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो, 99% लोकांना नाव सांगता येणार नाही
गोव्यापेक्षा 5 पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो
  • गोव्यापेक्षाही लहान, पण खिशात अख्खं जग

  • एका शहराचा संपूर्ण देश कसा झाला?

  • 99% लोकांना देशाचं नाव सांगता येणार नाही

View All
advertisement