'कचरा उचलला नाही' , रागाने बाई लालबूंद झाल्या, संतापात विद्यार्थिनींना बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारलं

Last Updated:

शिक्षिकेने केलेल्या मारहाणीत बेशुद्ध झालेल्या विद्यार्थिनीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

News18
News18
नागपूर : शाळेत आपली मुलं सुरक्षित राहतील, शिक्षकांकडून त्यांना चांगल्या गोष्टी शिकायाल मिळतील असा विश्वासही पालकांना असतो. पण नागपूरमध्ये एका शिक्षकाने जे केलं ते पाहून कोणाचाही शिक्षक या व्यक्तीवरूनच विश्वास उडेल. शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थिनीला प्लास्टिकचा कचरा न उचलल्याने बेदम मारहाण केली आहे. मनिषा चौधरी असे मारहाण करणाऱ्या शिक्षिकेचे नाव आहे. हा प्रकार नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथे घडला असून या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जातोय..
नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव गावातील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला. दुपारच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना शाळेत पडलेला प्लास्टिक कचरा उचलण्यास सांगण्यात आले. मात्र दोन विद्यार्थ्यानींनी तो आदेश न पाळल्याने शिक्षिकेने संतापून त्याला वर्गातच बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे विद्यार्थिनींच्या पाठीवर आणि हातावर जखमा झाल्या आहेत. यातील एक विद्यार्थिनी मारहाणीमुळे बेशुद्ध झाली होती, दोन दिवस रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिला सुट्टी देण्यात आली आहे, तर दुसऱ्या विद्यार्थीनिला मारहाणीमुळे व्रण उमटले आहे. या आधी देखील आरोपी शिक्षिका मनिषा चौधरीने मुलींना मारहाण केली होती, त्यावेळी पालकांनी केलेल्या तक्रारीचा राग मनात असल्याने जबर मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
advertisement

शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई

शिक्षण द्यायचं सोडून मुलांना अशा प्रकारे मारहाण करायची, हे अजिबात योग्य नाही. आम्ही या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे. शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून शाळेतील कामे करून घेणे हा गुन्हा मानला जाते. तरीदेखील शाळेत विद्यार्थ्यांना कचरा उचलण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आरोपी शिक्षिका मनिषा चौधरीवर निलंबनाची कारवाई केली आहे.
advertisement

व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह 

या संदर्भात नागपूर मधील कोंढाली पोलीस स्टेशन मध्ये आरोपी शिक्षिका मनीषा चौधरी विरोधात गुन्हा दाखल असून पोलीस या संदर्भात पुढील तपास करत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं सोडून त्यांच्याकडून कचरा उचलण्याचं काम करवून घेणं, आणि नकार दिल्याबद्दल मारहाण करणं, हा प्रकार न धक्कादायक आहे. या घटनेमुळे शैक्षणिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'कचरा उचलला नाही' , रागाने बाई लालबूंद झाल्या, संतापात विद्यार्थिनींना बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारलं
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement