Measles Rubella Vaccination : लहान मुलांना गोवर- रूबेलाचा धोका! डॉक्टर म्हणतात घाबरू नका; उल्हासनगमध्ये 'या' ठिकाणी मिळते मोफत लस
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Measles Rubella Vaccination : महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत गोवर आणि रुबेला आजाराचे निर्मूलन करण्याचे काम सुरू आहे. ही विशेष लसीकरण मोहिम उल्हासनगर जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. मनोहर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत गोवर आणि रुबेला आजाराचे निर्मूलन करण्याचे काम सुरू आहे. ही विशेष लसीकरण मोहिम उल्हासनगर जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. मनोहर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ ते १५ वर्षे वयोगटातील बालकांना गोवर-रुबेला (MR) लस दिली जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमधील पात्र विद्यार्थ्यांना गोवर- रुबेलाची लस मोफत दिली जाणार असून, लसीकरण मोहीम 100 टक्के यशस्वी होणार असल्याची माहिती डॉक्टर देत आहे. भारताला गोवर- रुबेला रोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या मोहिमेदरम्यान 3200 पेक्षा जास्त मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष पथके तयार केली आहेत.
advertisement
जिल्ह्यांतील आश्रमशाळेमधील मुलांचे १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ३५ पथक तयार केले आहेत. हे पथक आश्रमशाळेत जाऊन विद्यार्थ्यांना लस देणार आहेत. गोवर आणि रुबेला हे दोन्हीही संसर्गजन्य आजार आहेत. गोवर आजार पॅरामायक्सो व्हायरस नावाच्या विषाणूमुळे होतो. तर रुबेला आजार रुबेला विषाणूमुळे होतो. हे दोन्ही विषाणू संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकण्यातून हवेत पसरतात आणि निरोगी व्यक्तीला संक्रमित करू शकतात.
advertisement
गोवर आणि रूबेला आजाराच्या विशेष लसीकरण मोहिमेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहणार आहेत. शिवाय त्या दोन्हीही आजारांचा प्रसार रोखता येईल, अशी प्रतिक्रिया उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली.
advertisement
गोवर आजारात शरीरावर लाल रंगाची पुरळ येते, ताप, खोकला आणि सर्दी अशी लक्षणे दिसतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये न्यूमोनिया किंवा मेंदूज्वर सारखे आजार होण्याची शक्यता असते.
रुबेला आजाराला जर्मन गोवर असेही म्हणतात. रुबेला आजारामध्ये शरीरावर गुलाबी रंगाचे पुरळ येते, हा आजार गर्भवतींसाठी खूप धोकादायक असतो. जर गर्भवतीला रुबेला झाला तर बाळाला गंभीर आजार होण्याची शक्यता अधिक असते.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 17, 2025 4:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Measles Rubella Vaccination : लहान मुलांना गोवर- रूबेलाचा धोका! डॉक्टर म्हणतात घाबरू नका; उल्हासनगमध्ये 'या' ठिकाणी मिळते मोफत लस