जर तुम्हालाही 10-15 एपिसोड्सच्या वेब सिरिज पाहण्याचा कंटाळा आला असेल आणि तुम्ही अशा सीरिजच्या शोधात असाल ज्या एका वीकेण्डमध्ये किंवा अवघ्या काही तासांत संपवता येतील, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. आम्ही तुमच्यासाठी अशा 3 सीरिज निवडल्या आहेत, ज्या तुम्हाला खिळवून तर ठेवतीलच पण तुमचा वेळही वाचवतील.
1. कोहरा सीझन 2 (Kohrra Season 2)
advertisement
बरुण सोबतीची मुख्य भूमिका असलेली 'कोहरा' ही सीरिज सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. या सीरिजचा पहिला सीझन प्रचंड गाजल्यानंतर आता दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. का पाहावी? ही एक क्राईम थ्रिलर सीरिज असून नेटफ्लिक्सवर ती सध्या टॉप 10 मध्ये ट्रेंड करत आहे. या सीझनमध्ये केवळ 6 एपिसोड्स आहेत. प्रत्येक एपिसोड 40 ते 50 मिनिटांचा आहे. म्हणजे एका रात्रीत तुम्ही ही संपूर्ण मिस्ट्री उलगडू शकता. प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स (Netflix).
2. एस्पिरेंट्स (Aspirants)
युपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या तीन मित्रांची ही कथा केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. नवीन कस्तूरिया, शिवांकित परिहार आणि अभिलाष थपलियाल यांच्या अभिनयाने सजलेली ही सीरिज भावनिक गुंतवणूक करायला लावते.
का पाहावी? 'द व्हायरल फिव्हर' (TVF) ची ही एक मास्टरपीस सीरिज आहे. आयएमडीबीवर (IMDb) हिला 9 पेक्षा जास्त रेटिंग मिळाले आहे.
वेळ: याचे दोन सीझन आले असले तरी दोन्ही मिळून केवळ 10 एपिसोड्स आहेत. एका वीकेण्डसाठी हा परफेक्ट डोस आहे.
प्लॅटफॉर्म: अमेझॉन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video).
3. द फॅमिली मॅन 3 (The Family Man 3)
मनोज बाजपेयी म्हणजे अभिनयाची खाण आणि 'द फॅमिली मॅन' म्हणजे जबरदस्त थ्रिलर आणि कॉमेडीचं मिश्रण. श्रीकांत तिवारीच्या या साहसी सफरीचा तिसरा सीझन यावर्षीची मोठी हिट ठरली आहे.
का पाहावी? जयदीप अहलावत आणि मनोज बाजपेयी यांची जुगलबंदी पाहण्यासारखी आहे. जर तुम्ही पहिले दोन सीझन पाहिले असतील, तर तिसरा सीझन तुम्ही चुकवूच शकत नाही. या सीझनमध्ये केवळ 7 एपिसोड्स आहेत. त्यामुळे तुमचं मनोरंजनही होईल आणि जास्त वेळही जाणार नाही. प्लॅटफॉर्म: अमेझॉन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video).
