TRENDING:

'तिने माझ्या प्रायव्हेट पार्ट्सना...' आधी भर कार्यक्रमात डान्सरला उचलून फेकलं, ट्रोल झाल्यानंतर प्रसिद्ध सिंगरची सारवासारव

Last Updated:

Singer Dhananjay Sharma: या गायकाने लाइव्ह शोमध्ये महिला डान्सरसोबत जे कृत्य केलंय, ते पाहून कोणाच्याही तळपायाची आग मस्तकी जाईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
VIRAL VIDEO: भोजपूरी मनोरंजन विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध भोजपूरी सिंगर धनंजय शर्माचा एका लाइव्ह प्रोग्राममधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि संपूर्ण देशातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या व्हिडीओमुळे सध्या घनंजय वादाच्या भोवऱ्यात आला असून लाइव्ह शोमध्ये महिला डान्सरसोबत जे कृत्य केलंय, ते पाहून कोणाच्याही तळपायाची आग मस्तकी जाईल. व्हिडीओ व्हायरल होताच धनंजयला अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच आता धनंजयने स्वतः समोर येत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.
News18
News18
advertisement

महिला डान्सरसोबत धनंजयचं संतापजनक कृत्य

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये धनंजय स्टेजवर गाणं गात असताना अचानक महिला डान्सरला ओढत गर्दीमध्ये फेकण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा ती महिला स्टेजवरच पडते आणि लगेच ती तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते. पण धनंजय त्या महिलेला उचलून घेतो आणि स्टेजसमोरील गर्दीत फेकून देतो. यावेळी धनंजय चांगलाच संतापलेला दिसला.

advertisement

advertisement

आयुष्यात पाहिलं नसेल असं Maternity Photoshoot! बिग बॉस फेम इन्फ्लूएन्सरच्या बायकोने चक्क सवतीसोबत काढले फोटो

गर्दीत पडलेल्या महिला डान्सरला लोकांनी सावरलं आणि सुखरुप स्टेजवर पाठवलं. या भयानक प्रकारानंतर कार्यक्रमाच्या होस्टने माइकवरूनच धनंजयला सुनावलं. ती म्हणाली, हे चुकीचं आहे. तुम्ही चुकीचं केलं. काहीही असो, पण ती मुलगी आहे. ती लहान आहे. असं म्हणत तिने धनंजयने केलेल्या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी म्हटलं की अशाच लोकांमुळे महिला सुरक्षित नाही. काहींनी तर धनंजयला अटक करण्याची मागणीही केली. मात्र या घटनेनंतर बिहारमध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे हे नक्की.

advertisement

ट्रोल झाल्यानंतर धनंजयची सारवासारव

दरम्यान, या प्रकरणी आता स्वतः धनंजयने समोर येत त्याची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्याने आपली बाजू मांडली आहे. या व्हिडीओमध्ये धनंजय म्हणाला, "त्या व्हिडीओवरून लोकं मला ट्रोल करत आहेत, पण सत्य कोणालाच माहीत नाही. गाण्याच्या एका सीनमध्ये आम्हाला एकमेकांना धडक मारायची होती, पण त्या डान्सरने मलाच स्टेजवरून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. एका मॉडेलने तर मला लाथ मारली आणि माझ्या प्रायव्हेट पार्टला (छातीला) हात लावला. मी तिला स्टेजसमोरील गर्दीत फेकण्याचा प्रयत्न करत नव्हतो. मी फक्त तिला स्टेजवरून बाजूला ढकलत होतो, पण चुकून ती गर्दीत पडली."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणासोबत केली शेती, 90 दिवसांत दीड लाख रुपयांचा नफा, भोपळ्याच्या कसा केला प्रयोग?
सर्व पहा

धनंजय यावरच थांबला नाही, तर त्याने लवकरच या घटनेचा पूर्ण व्हिडीओ शेअर करणार असल्याचंही सांगितलं आहे. तथापि, घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. मुझफ्फरपूर पोलिसांना या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, धनंजय शर्माच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अशातच धनंजय शर्माने दिलेलं स्पष्टीकरण खरं आहे की त्याने जाणीवपूर्वक हे कृत्य केलं, हे आता पोलीस तपासातच स्पष्ट होईल.

मराठी बातम्या/मनोरंजन/
'तिने माझ्या प्रायव्हेट पार्ट्सना...' आधी भर कार्यक्रमात डान्सरला उचलून फेकलं, ट्रोल झाल्यानंतर प्रसिद्ध सिंगरची सारवासारव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल