करण जोहरच्या मुलांपासून ते हर्ष लिंबाचिया, उर्वशी रौतेला अशा अनेक सेलिब्रिटींकडे ही डॉल दिसली. आता तर बरेच जण हिचे चाहते झाले आहेत आणि ती विकत घेण्याचा विचार करत आहेत. पण नुकतंच 'बिग बॉस' फेम अर्चना गौतमने या डॉलशी संबंधित एक भयानक किस्सा शेअर केला आहे. एवढंच नाही, तर तिने तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना ही डॉल विकत न घेण्याचा सल्ला दिला आहे!
advertisement
अर्चना गौतमने सांगितला लबूबू डॉलचा भयानक अनुभव
अर्चना गौतमने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये लबूबू डॉलशी संबंधित एक खतरनाक अनुभव सांगितला. अर्चना म्हणाली, "तुम्हाला माहीत आहे का, मला आता काय ऐकायला मिळालंय, ही जी लबूबू आहे ना, ती माझ्या इथे तुचल नावाच्या एका मुलीकडे आली होती. तिने मला विचारलं, 'दीदी, तुम्ही लबूबू आणली आहे का?' मी म्हटलं, 'नाही, मी नाही आणली.' तिने मला सांगितलं, 'दीदी, ती आणू नका, कारण माझ्या मैत्रिणीने लबूबू आणली होती आणि तिचं ठरलेलं लग्न मोडलं.'"
Priyanka-Nick : धावत आली आणि उडी मारुन कडेवर बसली, प्रियांका चोप्राचा KISS करताना VIDEO व्हायरल
यापुढे 'बिग बॉस' फेम अर्चना म्हणाली, "जशी ती लबूबू घेऊन आली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला!" यानंतर अर्चनाजवळ बसलेल्या मुलीनेही याबद्दल सांगितलं. ती म्हणाली, "मित्रांनो, प्लीज लबूबू आणू नका, ती चांगली गोष्ट नाहीये. बनलेलं आयुष्य बिघडतं. लोकांचे वडील मृत्यू पावतात, त्यामुळे ती आणू नका."
शेवटी अर्चना म्हणाली, "सुदैवाने मी फ्री नव्हते, म्हणून मी लोखंडवाला मार्केटला गेले नाही. मी विचार करत होते की, जर मी फ्री असते, तर ती आणली असती. मलाही वाटत होतं की सगळेच लबूबू ट्रेंड करत आहेत, तर मी पण आणावी. पण देवाचे आभार, त्या लबूबूचं तोंड इतकं घाणेरडं आहे तरी लोक ती कशी विकत घेतात कळत नाही!"
सेलिब्रिटींमध्ये डॉलची क्रेझ, किमती ऐकून थक्क व्हाल!
अलीकडेच, कॉमेडियन भारती सिंगचा नवरा हर्ष लिंबाचियाने त्याच्या एका व्लॉगमध्ये सांगितलं होतं की त्यानेही लबूबू डॉल विकत घेतली आहे. जेव्हा भारती सिंगने त्याला त्याची किंमत विचारली, तेव्हा हर्ष म्हणाला की ती ११ हजार रुपयांची आहे! तर उर्वशी रौतेलाही तिच्या महागड्या पर्सवर एकाच वेळी चार लबूबू लावलेली दिसली होती. ही लबूबू डॉल दिसायला कितीही आकर्षक असली तरी, अर्चना गौतमने सांगितलेला हा अनुभव खरंच विचार करायला लावणारा आहे. आता सर्वांनाच हा प्रश्न पडला आहे की या डॉलमध्ये खरंच काहीतरी 'अशुभ' आहे की हा फक्त योगायोग आहे.
