Priyanka-Nick : धावत आली आणि उडी मारुन कडेवर बसली, प्रियांका चोप्राचा KISS करताना VIDEO व्हायरल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Priyanka Chopra-Nick Jonas Beach Vacation : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास त्यांच्या रोमँटिक वेकेशनमुळे चर्चेत आहेत. निकने पोस्ट केलेल्या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
मुंबई : बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आणि तिचा हॉलिवूडचा हसबंड निक जोनास नेहमीच त्यांच्या चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. त्यांच्यातील प्रेम आणि त्यांचं मॅरिड लाइफ अनेकांना भुरळ घालतं. सध्या प्रियांका आणि निक त्यांच्या नव्या रोमँटिक वेकेशनमुळे चर्चेत आहेत. काही तासांपूर्वीच निकने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो पाहिल्यानंतर चाहते पुन्हा त्यांच्या प्रेमात पडले आहेत. चाहत्यांना या जोडीची केमिस्ट्री इतकी आवडली आहे की, व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडतोय!
काळ्या स्वीमवेअरमध्ये प्रियांका चोप्राचा जबरदस्त बीच लूक
जोनस ब्रदर्सच्या 'आय कान्ट लूज' या गाण्यावर आधारित या व्हिडिओसोबत निकने कॅप्शन दिलं आहे, "मी उन्हाळ्याला असंच जाऊ देऊ शकत नाही." या व्हिडीओमध्ये निकने प्रियांकाशिवाय आणि प्रियांकासोबत असताना त्याचं आयुष्य कसं असतं याची क्यूट झलक दाखवली आहे. व्हिडिओची सुरुवात निक बीचवर उदास चेहऱ्याने बसल्याचं दाखवते. त्यावर लिहिलेलं आहे, 'तिच्याशिवाय'. पण एका सेकंदातच, प्रियांका चोप्रा धावत त्याच्या मिठीत येते, आणि मग दोघेही उन्हात, स्विमवेअरमध्ये एकमेकांना मिठी मारताना, किस करताना आणि हसताना दिसतात. यानंतर व्हिडिओवर येतं, 'तिच्यासोबत'. चाहत्यांना हा व्हिडिओ अक्षरशः वेड लावून गेला आहे!
advertisement
advertisement
निक जोनासच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिलंय, "निकियांका, खूप छान कपल!" दुसऱ्या एका युझरने म्हटलंय, "आपली 'देसी गर्ल' तिच्या नवऱ्यासोबत चांगला वेळ घालवतेय." अजून एका युझरने लिहिलंय, "हेच तेच प्रेम आहे, जे आपल्या सगळ्यांना हवंय!" तर एका कमेंटमध्ये, "हा 'देसी गर्ल'चाच इफेक्ट आहे," असं म्हटलंय. आणखी एका युझरने तर, "हे दोघे आपले कपल गोल्स सेट करत आहेत," असंही लिहिलं आहे.
advertisement
प्रियांका चोप्राच्या बॉलिवूड कमबॅकसाठी चाहते आतुर
प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची हॉलिवूड चित्रपट 'हेड्स ऑफ स्टेट' मध्ये दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत इद्रिस एल्बा आणि जॉन सीना असे मोठे स्टार्स आहेत. हा चित्रपट ब्रिटिश पंतप्रधान आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांमधील एका अनपेक्षित युतीवर आधारित आहे. या चित्रपटात प्रियांका एका धोकादायक MI6 एजंटची भूमिका साकारत आहे, जी तिच्या नेहमीच्या भूमिकेपेक्षा खूपच वेगळी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 17, 2025 3:52 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Priyanka-Nick : धावत आली आणि उडी मारुन कडेवर बसली, प्रियांका चोप्राचा KISS करताना VIDEO व्हायरल