'...नाहीतर दर महिन्याला एकाला मारू', आधी गायकावर गोळीबार, आता दिली धमकी, हल्लेखोर म्हणाला...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rahul Fazilpuria : लोकप्रिय बॉलिवूड आणि हरियाणवी गायक राहुल फाजिलपुरियावर सोमवारी १४ जुलै २०२५ रोजी गुरुग्राममध्ये धक्कादायक गोळीबार झाला.
मुंबई : लोकप्रिय बॉलिवूड आणि हरियाणवी गायक राहुल फाजिलपुरियावर सोमवारी १४ जुलै २०२५ रोजी गुरुग्राममध्ये धक्कादायक गोळीबार झाला. अज्ञात हल्लेखोरांनी गुरुग्रामच्या हद्दीवरील बादशाहपूरजवळ त्याच्यावर गोळीबार केला होता. सुदैवाने, राहुल फाजिलपुरिया थोडक्यात बचावला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांच्या हाती मोठं यश लागलं आहे. पोलिसांनी २५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे, ज्याने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलिसांनी हरियाणामधील सोनीपत जिल्ह्यातील जज्जल येथील रहिवासी असलेल्या विशाल नावाच्या तरुणाला अटक केली आहे. त्याने फाझिलपुरियाच्या हालचालींवर पाळत ठेवून तो कुठे आहे याची माहिती गोळीबार करणाऱ्यांना दिली होती. मिडिया रिपोर्ट्सनुसार, हल्ल्यापूर्वी विशाल बरेच दिवस गुरुग्राममध्ये थांबला होता आणि गोळीबार झाला त्या दिवशीही तो शहरातच होता.
राहुल फाजिलपुरियावर का झाला हल्ला?
advertisement
दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी सुनील सरधानिया नावाच्या व्यक्तीने घेतली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून त्याने सांगितलं की, या हल्ल्यात त्याच्यासोबत दीपक नांदल आणि इंद्रजित यादव हे दोघेही सामील होते. तसेच, फाझिलपुरियाने नांदलचे ५ कोटी रुपये बुडवल्याचा दावाही त्याने केला आहे.
advertisement
"दीपकने फाझिलपुरियाला सेलिब्रिटी बनवण्यासाठी ५ कोटी रुपये गुंतवले होते. प्रसिद्ध झाल्यावर राहुल फाझिलपुरियाने आपल्या राजकीय ताकदीचा वापर करत गेल्या दोन वर्षांपासून ना फोन उचलला, ना कोणाला उत्तर दिलं. याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आता ही शेवटची वॉर्निंग आहे, त्याने पैसे परत द्यावेत, नाहीतर त्याच्यासोबत फिरणाऱ्या १० ओळखीच्या आणि नातेवाईकांची माहिती आमच्याकडे आहे," असा धमकीचा सूर त्या सोशल मीडिया पोस्टमध्ये होता.
advertisement
राहुल फाजिलपुरियाला कशी मिळाली प्रसिद्धी?
फाझिलपुरियाने अजूनतरी या आरोपांवर किंवा हल्ल्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार, २०१० मध्ये फाझिलपुरिया आणि नांदल यांची जेलमध्येच भेट झाली होती. फाझिलपुरियाचं खरं नाव राहुल यादव आहे. २०१६ मध्ये आलिया भट्ट, फवाद खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या 'कपूर अँड सन्स' चित्रपटातील 'कर गई चूल' या गाण्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. हा गोळीबार नेमका कशामुळे झाला, याची पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 17, 2025 2:46 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'...नाहीतर दर महिन्याला एकाला मारू', आधी गायकावर गोळीबार, आता दिली धमकी, हल्लेखोर म्हणाला...