प्लॅटफॉर्मवर काळोखात दिसले 2 मुलं आणि 1 मुलगी, RPF जवान जवळ जातात कळाली अशी गोष्ट ऐकून सगळेच शॉक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
प्लॅटफॉर्म क्रमांक दोन-तीनवर पोहोचल्यावर त्यांना अंधारात तीन मुलं त्यांना दिसली, जवळ गेल्यावर कळलं की दोन मुलं आणि एक मुलगी तेथे होती.
मुंबई : भारतीय रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसोबतच लहान मुलांचंही विशेष काळजीपूर्वक संरक्षण केलं जातं. यासाठीच “ऑपरेशन नन्हें फरिश्ते” ही मोहीम रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक हरवलेली किंवा पळून गेलेली मुलं शोधून त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवले जात आहे. अशीच एक घटना नुकतीच उत्तर प्रदेशातील मिर्झापूर रेल्वे स्टेशनवर घडली.
रात्री साधारण साडेदहा वाजण्याच्या सुमारास मिर्झापूर रेल्वे स्टेशनवर आरपीएफचे जवान गस्त घालत होते. प्लॅटफॉर्म क्रमांक दोन-तीनवर पोहोचल्यावर त्यांना अंधारात तीन मुलं त्यांना दिसले. त्यामध्ये दोन मुले आणि एक मुलगी होती. त्यांची अवस्था संशयास्पद आणि घाबरलेली दिसताच जवान तात्काळ त्यांच्या जवळ गेले. मात्र सुरुवातीला मुलं काहीही बोलायला तयार नव्हती.
यानंतर चाइल्ड लाईन मिर्झापूरच्या टीमला बोलावण्यात आलं. सुपरवायझर दारा सिंह आणि केस वर्कर अमरदीप यांनी मुलांशी सहानुभूतीने संवाद साधला. त्यावेळी मुलांनी सांगितलं की ते आपल्या घरातून पळून आले आहेत आणि इटारसीला जाण्याचा त्यांचा बेत होता. पुढील चौकशीत त्यांनी मिर्झापूर आणि भदोही जिल्ह्यातील ते असल्याचंही स्पष्ट केलं.
advertisement
यानंतर आरपीएफच्या जवानांनी तिन्ही मुलांना सुरक्षितपणे पोस्टवर आणलं, त्यांना पाणी आणि अन्न देऊन त्यांना सांभाळलं. आवश्यक चौकशीनंतर तिन्ही नाबालिगांना चाइल्ड लाईन मिर्झापूरच्या देखरेखीखाली सोपवण्यात आलं.
या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं की रेल्वे सुरक्षा दल केवळ प्रवाशांच्या सुरक्षेसाठीच नव्हे तर अशा नन्ह्या फरिश्त्यांच्या संरक्षणासाठीही सदैव तत्पर आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 11:19 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
प्लॅटफॉर्मवर काळोखात दिसले 2 मुलं आणि 1 मुलगी, RPF जवान जवळ जातात कळाली अशी गोष्ट ऐकून सगळेच शॉक