दिल्ली स्फोटात हल्लेखोरही झाला ठार? पोलिसांना वेगळाच संशय, 3 तास आधी काय घडलं?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Delhi Red Fort Blast: राजधानी दिल्लीत सोमवारी सायंकाळी घडलेल्या स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. यात दुर्दैवी घटनेत एकूण ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आता या स्फोटात स्फोट घडवणारा देखील मारला गेल्याचा संशय व्यक्त होत आहे.
राजधानी दिल्लीत सोमवारी सायंकाळी घडलेल्या स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. यात दुर्दैवी घटनेत एकूण ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर २४ जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला घडताच तपास यंत्रणा आणि पोलीस दल सक्रीय झालं आहे. देशभर अनेक ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. आतापर्यंत पोलिसांनी २०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असून १३ जण संशयितांची चौकशी सुरू आहे. रात्री उशिरा पोलिसांनी दोन जणांना ताब्यात देखील घेतलं आहे.
दरम्यान आता दिल्ली स्फोटाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या कारच्या स्फोटात आठ लोकांचा बळी गेला, त्यात स्फोट घडवणारा हल्लेखोरही ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. हा हल्ला आत्मघाती स्फोट होता का? याबाबत पोलिसांना दाट संशय आहे. पोलीस त्या अनुषंगाने गंभीरपणे तपास करत आहेत.
लाल किल्ला स्फोट हा आत्मघाती हल्ला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हल्ल्यापूर्वी हल्ल्यात वापरलेली i20 कार तीन तास सुनेहरा मशीदजवळील पार्किंगमध्ये उभी होती. पार्किंगमधून कार बाहेर पडल्यानंतर अवघ्या चारच मिनिटांत लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट घडला आणि यात आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये हल्लेखोराचा देखील समावेश असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. गर्दीच्या वेळी स्फोट घडवण्याचं नियोजन होतं, अशी माहितीही आता समोर येत आहे.
advertisement
सूत्रांच्या माहितीनुसार, स्फोटाच्या आधी I-20 कार चालवणारा फक्त एकच व्यक्ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला आहे. टोल पार करताना आणि नंतर लाल किल्लाच्या सिग्नलपर्यंत पोहोचेपर्यंत कारमध्ये एकच व्यक्ती दिसून आली आहे. त्यामुळे हा फिदायीन (आत्मघाती) हल्ला असू शकतो, असा तपास यंत्रणांना संशय आहे. स्पेशल सेल आणि केंद्रीय तपास यंत्रणा या संपूर्ण फिदायीन अँगलवर गंभीरपणे तपास करत आहेत.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 11, 2025 9:29 AM IST


