Mumbai High Alert: राजधानी स्फोटाने हादरली! मुंबईकरांनो सतर्क राहा, पोलीस अलर्ट मोडवर ; ठिकठिकाणी नाकेबंदी

Last Updated:

Mumbai High Alert : दिल्लीतील स्फोटानंतर आता मुंबई पोलीस एकदम अलर्ट मोडवर आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे

Mumbai High Alert
Mumbai High Alert
नवी दिल्ली :  दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी (10 नोव्हेंबरला)सायंकाळी झालेल्या हल्ल्याने राजधानी हादरली आहे . दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ झालेल्या शक्तिशाली स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. . हा स्फोट प्रचंड तीव्रतेचा असून आजूबाजूचा परिसर आवाजाने हादरला. दिल्लीतील स्फोटानंतर आता मुंबई पोलीस एकदम अलर्ट मोडवर आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी झडती घेण्यात आली. धार्मिक स्थळे, बाजारपेठा, हॉटेल्सची कसून तपासणी करण्यात आली. तसेतच गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. दिल्लीतील हल्ल्यानंतर विशेष अलर्ट आल्याने मुंबई पोलीस अलर्ट मोडवर असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई पोलिसांनी गस्त वाढवली

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई कायमच टार्गेटवर असते, मात्र दिल्ली हल्ल्यानंतर केंद्रीय यंत्रणांकडून अलर्ट आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. मुंबईत पोलिसांकडून ठिकठिकाणी झाडझडती घेण्यात आली. विविध भागांत कसून तपासणी करण्यात आली. तसेच धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी गस्त वाढवली आहे. ज्या परिसरात नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
advertisement

मुंबई पोलिसांचे आवाहन 

मुंबई पोलीस शक्य ती खबरदारी घेत असून त्यामुळे पोलीस अधिक अलर्ट झाले असून ठिकठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच ट्रेनमध्ये, गर्दीच्या ठिकाणी कुठेही संशयास्पद वस्तू किंवा हालाचाली आढळल्यास तात्काळ मुंबई पोलिसांना या संदर्भात माहिती द्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर

मुंबईतील हॉटस्पॉट मानले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला आता पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय निर्णय घेत बॉम्बस्फोट आणि दंगल नियंत्रण पथक महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केली आहेत. चर्चगेट, सीएसएमटी, दादर, वांद्रे या महत्त्वाच्या स्थानकांवर झाडाझडती सुरू झाली आहे. दिल्लीच स्पॉटनंतर मुंबई पोलिसांकडून अधिकची खबरदारी घेण्यास सुरुवात झाल्याचे दृश्य सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे.
advertisement

दिल्लीत हाय अलर्ट 

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ पार्क केलेल्या एका कारमध्ये स्फोट झाला आहे. या घटनेनंतर आणखी तीन गाड्यांना आग लागल्याचे सांगितले जात आहे. अग्निशमन दलाने सांगितले की त्यांना कारमध्ये स्फोट झाल्याचा फोन आला.त्यानंतर अग्निशमन दलाचे पथ तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. साधारण संध्याकाळी 6 वाजून ४५ मिनिटांनी स्फोट झाल्याची माहिती आहे. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलिस, अग्निशमन दल आणि सुरक्षा पथकं तैनात करण्यात आली असून, परिसरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai High Alert: राजधानी स्फोटाने हादरली! मुंबईकरांनो सतर्क राहा, पोलीस अलर्ट मोडवर ; ठिकठिकाणी नाकेबंदी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement