Delhi Blast: दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, कानठळ्या बसवणारा आवाज, १० ते १५ गाड्यांच्या चिंधड्या, हादरवून सोडणारे ७ फोटो

Last Updated:
New Delhi Red Fort Blast: राजधानी नवी दिल्ली सोमवारी सायंकाळी सहा वाजून ४५ मिनिटांनी स्फोटाने हादरून गेली. एका इको व्हॅनमध्ये सर्वांत प्रथम स्फोट झाला. त्यानंतर अनेक गाड्यांना आग लागली.
1/7
बिहार विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना सोमवारी राजधानी नवी दिल्ली स्फोटाने हादरून गेली. या घटनेत नऊ लोकांचा मृत्यू (संध्याकाळी साडे सातपर्यंत) झाल्याची माहिती कळते आहे.  संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशन परिसरात स्फोटाचे कानठळ्या बसवणारे आवाज आले.

advertisement
2/7
लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशन परिसरात असलेल्या चार ते पाच गाड्यांना आग लागली. तसेच परिसरात असलेल्या १० ते १५ गाड्यांच्या चिंधड्या उडाल्या. आगीच्या ज्वाळांनी आकाशात धुराचे लोट झाले.

3/7
एका इको व्हॅनमध्ये सर्वांत प्रथम स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर इको व्हॅनच्या शेजारील गाड्यांना आग लागली. घटना नेमकी काय घडलीये कशामुळे आग लागलीये हे सुरुवातीला नागरिकांना कळाले नाही. मात्र कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने स्फोट झाल्याचा अंदाज नागरिकांनी लावला.

4/7
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, मी चहा पित होतो. त्याचवेळी मोठा आवाज झाला. काही क्षणांत तीन गाड्यांना आग लागल्याचे मला समोर दिसले. हातातला कप खाली टाकून मी पळायला लागलो. स्फोटाचा आवाज एवढा होता की मला घाबरून जायला झाले

5/7
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ अतिशय जोरदार स्फोट झाला आहे. स्फोटाचा प्रकार अजून स्पष्ट झालेला नाही.

6/7
DCP स्पेशल सेलसह पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि परिसराला वेढा घालण्यात आला आहे. स्फोटाचे कारण आणि स्वरूप जाणून घेण्यासाठी तपास सुरू आहे.

7/7
सोमवारी लाल किल्ला पर्यटनासाठी बंद असतो. इतर दिवशी ही घटना घडली असती तर मोठ्या नुकसानीची शक्यता होती. कारण अनेक पर्यटक त्यांच्या कुटुंबासह, मित्र मैत्रिणींसह येतात. विदेशी पर्यटकांची देखील संख्या जास्त असते.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement