Delhi Red Fort Blast: मोठी बातमी, दिल्ली कार स्फोटामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, अनेक जण जखमी
- Published by:Sachin S
Last Updated:
या स्फोटामध्ये अनेक जण जखमी झाले आहे, जखमींना तातडीने LNJP कारमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे.
नवी दिल्ली : देशभरात एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू आहे, अशातच देशाची राजधानी दिल्ली स्फोटाने हादरली आहे. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये भीषण असा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती, LNJP रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. न्यूज१८ नेटवर्कच्या हाती लागललेल्या माहितीनुसार, रुग्णालयाकडून 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या स्फोटामध्ये अनेक जण जखमी झाले आहे, जखमींना तातडीने LNJP कारमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. या कारमध्ये हा शक्तिशाली स्फोट झाला आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ अतिशय शक्तिशाली स्फोट झाला आहे. हा स्फोट एका मारुती सुझुकीच्या इको व्हॅनमध्ये झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पार्किंगच्या परिसरात ही व्हॅन उभी होती. संध्याकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास स्फोट झाला. स्फोटाचा प्रकार अजून स्पष्ट झालेला नाही. DCP स्पेशल सेलसह पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि परिसराला वेढा घालण्यात आला आहे. स्फोटाचे कारण आणि स्वरूप जाणून घेण्यासाठी तपास सुरू आहे. या स्फोटामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एनजीपी रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
advertisement
दरम्यान, लाल किल्ला परिसरात झालेल्या जोरदार स्फोटानंतर फॉरेन्सिक आणि तांत्रिक तज्ज्ञ घटनास्थळी पोहोचले आहेत. हे तज्ज्ञ स्फोटाचा प्रकार आणि त्यामागील कारण शोधण्यासाठी तपास करत आहेत. सुरक्षादलांनी परिसराला वेढा घातला असून, पोलिस आणि केंद्रीय एजन्सींचे अधिकारीही तपासात सहभागी झाले आहेत. प्राथमिक तपासानंतरच स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
घटनास्थळी NIA आणि NSGच्या टीम दाखल
view commentsलाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर आता केंद्रीय तपास संस्था NIA आणि राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG) यांच्या टीम घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. दोन्ही पथके लवकरच स्फोटाच्या ठिकाणी पोहोचून कारण आणि स्वरूपाची तपासणी करतील. यापूर्वी फॉरेन्सिक आणि तांत्रिक तज्ज्ञांनी प्राथमिक तपास सुरू केला असून, सुरक्षा यंत्रणांनी परिसर पूर्णपणे बंद केला आहे. दिल्ली पोलिस आणि केंद्रीय एजन्सींचा संयुक्त तपास सध्या सुरू आहे.
Location :
Delhi,Delhi
First Published :
November 10, 2025 7:54 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी, दिल्ली कार स्फोटामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, अनेक जण जखमी


