Delhi Red Fort Blast: दिल्लीवर दहशतवादी हल्ला, स्फोटात IED चा वापर, एका संशयिताला घेतलं ताब्यात
- Published by:Sachin S
Last Updated:
स्फोटामध्ये IED चा वापर करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीमध्ये शक्तिशाली स्फोट झाला आहे. लाल किल्ला परिसरात एका कारमध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर २४ जण जखमी झाले आहे. हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचं आता समोर आलं आहे. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. स्फोटामध्ये IED चा वापर करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. IED स्फोट हा दहशतवादी किंवा माओवाद्यांकडून घडवण्यात आल्याच्या आतापर्यंतच्या घटना आहे. या स्फोटानंतर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
एकीकडे बिहार विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे, सर्वच राजकीय पक्ष बिहारच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहे. अशातच दिल्लीतील लाल किल्ला परिसरात संध्याकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास एका हुंदईच्या I20 कारमध्ये शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर दिल्ली नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांनी अवघ्या २ तासांमध्ये एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. व्हॅनमध्ये हा IED स्फोट होता, अशी माहितीही समोर आली आहे. त्यामुळे तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहे.
advertisement
स्फोटामुळे गाड्यांना लागली आग
हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, आजूबाजूचा परिसर स्फोटानं हादरला. घटनास्थळी हुंदईच्या I20 कारजवळ उभ्या असलेली कार, रिक्षा आणि दुचाकींना आग लागली. या स्फोटामध्ये काही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. या स्फोटानंतर गाड्यांना आग लागली. घटनेती माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम सुरू केलं आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक पथक तपास करत असून, स्फोटाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. सुरक्षा यंत्रणांनी परिसर सील केला आहे आणि सर्व बाजूने तपास सुरू आहे.
advertisement
अमित शाह यांचा पोलीस आयुक्तांना फोन
view commentsलाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली घटनास्थळाची माहिती घेतली. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली. गृहमंत्रालयाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून, तपास यंत्रणांना तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Location :
Delhi,Delhi
First Published :
November 10, 2025 8:55 PM IST
मराठी बातम्या/देश/
Delhi Red Fort Blast: दिल्लीवर दहशतवादी हल्ला, स्फोटात IED चा वापर, एका संशयिताला घेतलं ताब्यात


