Blast किंवा स्फोट झाला म्हणजे नेमकं काय होतं? दिल्ली घटनेनंतर सर्वांच्या मनात उठलेला प्रश्न

Last Updated:

काही क्षणांत प्रचंड आवाज, धूर आणि भीतीने भरलेलं वातावरण तयार होतं. पण या सर्वामागचं विज्ञान आणि परिणाम समजून घेणं गरजेचं आहे.

AI Generated Photo
AI Generated Photo
मुंबई : दिल्लीमध्ये झालेल्या अलीकडच्या स्फोटानंतर सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मुंबई, युपी सारख्या मोठ्या शहरात हायअलर्ट जाहीर केला गेला आहे. पण आता या स्फोटानंतर एक सामान्य प्रश्न उपस्थीत होतो, तो म्हणजे स्फोट किंवा ब्लास्ट होतो म्हणजे नेमकं काय होतं, ज्यामुळे गाड्या, दुकानं, इमारतीचं नुकसान होतं आणि लोकांचे प्राण जातात?
काही क्षणांत प्रचंड आवाज, धूर आणि भीतीने भरलेलं वातावरण तयार होतं. पण या सर्वामागचं विज्ञान आणि परिणाम समजून घेणं गरजेचं आहे.
ब्लास्ट म्हणजे काय? (what is Blast)
‘ब्लास्ट’ म्हणजे अशी घटना जिथे काही सेकंदांतच प्रचंड उर्जा (energy) एका ठिकाणी साचून ती अचानक बाहेर पडते. ही उर्जा रासायनिक (chemical), यांत्रिक (mechanical) किंवा अगदी विद्युत (electrical) स्वरूपात असू शकते. जेव्हा ती बाहेर पडते, तेव्हा तिच्यासोबत निर्माण होतो खूप मोठा आवाज, धुळीचा वादळासारखा झोत आणि दाबाची प्रचंड लाट (shock wave) जी खूप लांबपर्यंत जाते.
advertisement
ब्लास्ट कसा होतो? (How Blast happened)
स्फोटक पदार्थ (explosives) किंवा गॅस लीकेज झाल्यास त्यात ऑक्सिजनशी झपाट्याने रासायनिक क्रिया होते आणि काही सेकंदांतच हवा, दाब, आणि उष्णता यांचा स्फोटक संयोग तयार होतो. यामुळे एका ठिकाणी असलेला दाब बाहेरच्या दिशेने झपाट्याने पसरतो. या क्षणी होणारा ‘ब्लास्ट वेव्ह’ आजूबाजूच्या वस्तूंना आणि माणसांना प्रचंड नुकसान पोहोचवू शकतो. लोखंडाच्या सारख्या वस्तू तोडू किंवा मोडू शकतात.
advertisement
ब्लास्टनंतर फक्त आग आणि धूर दिसतो असं नाही त्याचे परिणाम दूरवर जाणवतात. जवळच्या परिसरात इमारतींच्या भिंती आणि काचा फुटतात, धूर आणि वायू श्वासाद्वारे शरीरात जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक धक्का (trauma) दीर्घकाळ टिकतो
advertisement
दिल्लीतील घटनेतही लोकांनी सांगितलं की काही सेकंदांत सगळं हलल्यासारखं वाटलं. हीच ती ‘शॉक वेव्ह’ जी ब्लास्टनंतर सर्वत्र पसरते.
ब्लास्ट म्हणजे केवळ आवाज किंवा आग नव्हे, तर ती ऊर्जेचा अनियंत्रित स्फोट असतो जो सेकंदांतच जीवन उलथवून टाकतो.
अशा घटना आपल्याला सतर्क राहण्याची, सुरक्षा नियमांचं पालन करण्याची आणि सार्वजनिक ठिकाणी काही संशयास्पद दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवण्याची आठवण करून देतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Blast किंवा स्फोट झाला म्हणजे नेमकं काय होतं? दिल्ली घटनेनंतर सर्वांच्या मनात उठलेला प्रश्न
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement