लोक उडून पडले, एकाचा हात माझ्या समोर पडला; प्रत्यक्षदर्शीने सांगितले दिल्ली स्फोटाचा थरकाप

Last Updated:

Delhi Explosion: नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ मोठा स्फोट झाला असून यात नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. स्फोटानंतर दिल्ली, मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

News18
News18
नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीतील प्रसिद्ध लाल किल्ला येथील मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक १ जवळ उभ्या असलेल्या एका गाडीत मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. हाती आलेल्या रिपोर्टनुसार किमान 3 गाड्यांना आग लागली आहे. या स्फोटात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
advertisement
एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, अचानक मोठ्या स्फोटाचा आवाज झाला. जणू काही जमीन हादरली. माझ्या हातात चहाचा कप होता. लोकांची धावपळ सुरू झाली. स्फोटामुळे लोक उडून पडले. जे माझ्या पायाजवळ येऊन पडले. ज्या गाडीत स्फोट झाला त्याच्या आजूबाजूच्या 3 गाड्यांना आग लागली. हा स्फोट नेमका कशाचा आहे हे अद्याप समजले नाही.
advertisement
दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, स्फोटानंतर मोठा आवाज झाला आणि एकाचा तुटलेला हात माझ्या समोर येऊन पडला.
advertisement
या स्फोटानंतर संपूर्ण दिल्ली परिसरात हाय अलर्ट देण्यात आला आहे. इतक नाही तर मुंबईत देखील हाय अलर्ट दिला आहे.  स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की मी 3 वेळा पडलो. जणून काही मृत्यू समोर आला होता असे या परिसरात स्टॉल असलेल्या एका व्यक्तीने सांंगितले.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
लोक उडून पडले, एकाचा हात माझ्या समोर पडला; प्रत्यक्षदर्शीने सांगितले दिल्ली स्फोटाचा थरकाप
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement