क्रॅश येणार आहे! भयावह इशाऱ्याने बाजारात धडकी; जगभर भीतीचं सावट, एकच गोष्ट सर्वांना वाचवेल

Last Updated:

Warning For Global Investors: ‘रिच डॅड पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा जगभरातील गुंतवणूकदारांना हादरवणारा इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की “मोठा क्रॅश येणारच आहे”. आणि सोनं, चांदी व बिटकॉइन हेच आता सुरक्षित आश्रयस्थान आहेत.

News18
News18
नवी दिल्ली:रिच डॅड पुअर डॅड’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी हे नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना इशारा आणि सल्ला देत असतात. त्यांच्या पोस्ट्समध्ये नेहमीच सोने (Gold), चांदी (Silver) आणि बिटकॉइन (Bitcoin) या गुंतवणुकीच्या साधनांचा उल्लेख असतो. आणि आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या X अकाउंटवरून एक मोठा इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत लिहिलं आहे की, क्रॅश येणार आहे! आणि या आर्थिक धक्क्याच्या इशाऱ्यासोबत त्यांनी सांगितलं की- ते अजूनही सोने विकत नाहीत, उलट अजून खरेदी करत आहेत.
advertisement
क्रॅश येणार, पण मी सोने...
रॉबर्ट कियोसाकी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, क्रॅश येणार आहे आणि मी माझं गोल्ड विकत नाही, तर अजून खरेदी करतो आहे. ते पुढे म्हणतात- गोल्डसाठी माझं टार्गेट प्राइस $27,000 आहे. हा अंदाज माझ्या मित्र जिम रिकर्ड्स कडून मिळालेला आहे आणि माझ्याकडे दोन सोन्याच्या खाणी आहेत.
advertisement
कियोसाकी सांगतात की- त्यांनी 1971 साली सोने खरेदी करायला सुरुवात केली होती. त्याच वर्षी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी यूएस डॉलरला सोन्याच्या बॅकिंगपासून वेगळं केलं होतं.
आर्थिक नियम मोडला
रॉबर्ट कियोसाकी यांनी म्हटलं की, निक्सनने ग्रेशमचा नियम (Gresham’s Law) मोडला. हा नियम एक महत्त्वाचा आर्थिक सिद्धांत आहे जो सांगतो की- वाईट चलन चांगल्या चलनाला बाजारातून हाकलून लावते.
advertisement
कियोसाकी म्हणतात, जेव्हा सिस्टीममध्ये बनावट पैसा (Fake Money) येतो; तेव्हा खरं सोनं आणि खरी किंमत असलेलं चलन लोक लपवतात. असं झालं की अर्थव्यवस्था कृत्रिम पैशांवर उभी राहते आणि धोका वाढतो.
बिटकॉइन, सिल्वर आणि इथेरियमसाठी नवे टार्गेट
advertisement
कियोसाकी यांनी 2026 साठी Bitcoin, Silver आणि Ethereum यांचे नवीन टार्गेट जाहीर केले आहेत. बिटकॉइनसाठी त्यांनी $250,000 चे लक्ष्य दिलं आहे, चांदीसाठी $100, आणि इथेरियमसाठी $60 चं टार्गेट सांगितलं आहे. ते म्हणाले- मी या सगळ्या ऍसेट्समध्ये गुंतवणूक करत राहणार आहे, जरी बाजार कोसळला तरी.
advertisement
यूएस ट्रेझरी आणि फेड 
कियोसाकी यांनी आपल्या पोस्टमध्ये अमेरिकेच्या US Treasury आणि Federal Reserve (Fed) यांच्यावरही थेट टीका केली. त्यांनी म्हटलं दुर्दैवाने, यूएस ट्रेझरी आणि फेड दोघंही ठरलेले नियम मोडतात. ते त्यांच्या बिलांचे पैसे देण्यासाठी खोटा पैसा छापतात. पण जर तुम्ही आणि मी असं केलं, तर आम्हाला तुरुंगात टाकलं गेलं असतं.
advertisement
कियोसाकी पुढे म्हणाले- मी पैशांशी संबंधित सर्व आर्थिक नियमांचं पालन करतो. ग्रेशमचा नियम आणि मेटकाफचा नियम हे माझ्या विचारांचे पाया आहेत.
सावध राहा, पुढे खूप...
रॉबर्ट कियोसाकी यांनी इशारा दिला की- आज अमेरिका इतिहासातील सर्वात मोठा कर्जदार देश बनला आहे. त्यांच्या मते, अमेरिकेवर प्रचंड कर्ज आहे आणि ही स्थिती धोकादायक आहे. म्हणूनच मी गुंतवणूकदारांना इशारा देतो सेव्हिंग करणारे हरतात!
ते पुढे म्हणाले, मी सोने, चांदी, बिटकॉइन आणि इथेरियम खरेदी करत राहीन. कारण पुढच्या काळात खूप पैसा सिस्टीममध्ये येणार आहे.
रॉबर्ट कियोसाकी यांचा संदेश स्पष्ट आहे. ते म्हणतात- क्रॅश येणारच, पण जो तयार असेल तोच वाचेल.  म्हणजेच त्यांच्या दृष्टीने सोने, चांदी आणि क्रिप्टो हे संकटातही सुरक्षित आश्रयस्थान (Safe Haven) आहेत आणि जगभरातील गुंतवणूकदारांनी आता डोळे उघडण्याची वेळ आली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
क्रॅश येणार आहे! भयावह इशाऱ्याने बाजारात धडकी; जगभर भीतीचं सावट, एकच गोष्ट सर्वांना वाचवेल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement