Gavran Chicken Recipe : लाडक्या बायकोसाठी बनवा सुकं आणि रस्सा चिकन! टेंशन घेऊ नका, ही आहे सोपी रेसिपी

Last Updated:

Village Style Chicken Curry In Marathi : गावाडकच्या पद्धतीने बनवलेलं हे चिकन खाऊन तुमची बायको नक्कीच खूश होईल. चला तर मग, घरात दरवळणारा चिकनचा सुगंध आणि बायकोच्या चेहऱ्यावरचं हास्य मिळवण्यासाठी ही रेसिपी करून पाहूया.

सुकं चिकन आणि रस्सा चिकन बनवण्याची पद्धत..
सुकं चिकन आणि रस्सा चिकन बनवण्याची पद्धत..
मुंबई : आपल्यासाठी रोज स्वयंपाक बनवणाऱ्या लाडक्या बायकोला काहीसा आराम देण्यासाठी एक भन्नाट आयडिया आहे. तुम्ही तिला एक स्वादिष्ट सुकं आणि रस्सा चिकन बनवून खाऊ घाली शकता. ते कसं बनवावं याचं टेंशन अजिबात घेऊ नका. इथे आम्ही तुम्हाला ते बनवण्याची अगदी सोपी रेसिपी सांगत आहोत. गावाडकच्या पद्धतीने बनवलेलं हे चिकन खाऊन तुमची बायको नक्कीच खूश होईल. चला तर मग, घरात दरवळणारा चिकनचा सुगंध आणि बायकोच्या चेहऱ्यावरचं हास्य मिळवण्यासाठी ही रेसिपी करून पाहूया.
साहित्य
- लसून
- तेल
- हळद
- चिकन
- मीठ चवीनुसार
- पाणी
- भाजलेला कांदा
- भाजलेलं खोबरं
- आलं
- कोथिंबर
- टोमॅटो
- तिखट, मसाला
- बेडगी मिरची पावडर
- कांदा लसून चटणी
चिकन शिजवण्याची पद्धत
मंद आचेवर कुकर ठेवून त्यात तेल घाला. यानंतर त्यात थोडा लसून आणि हळद घाला.
advertisement
यानंतर त्यात चिकन घाला. यानंतर त्यात चवीनुसार खडेमीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला. यानंतर हे चिकण एक ते दोन शिट्ट्या घेऊन व्यवस्थित शिजवून घ्या. तुम्ही पातेल्यात देखील ते शिजवू शकता.
वाटण तयार करण्याची पद्धत
दुसरीकडे एक वाटण तयार करा. यासाठी कांदा आणि कोबरं भाजून घ्या. सोबतच लसून, आलं आणि कोथिंबिरी चिरून घ्या आणि त्याचे मसाला वाटण तयार करून घ्या. आता एका कढईत तेल घेऊन त्यात तिखट, हळद घाला. त्यातच बेडगी मिरची पावडर आणि कांदा लसून चटणी घ्याला. यानंततर त्यात आपण तयार केलेलं वाटण घाला आणि ते छान भाजून घ्या. या मसाल्याचे दोन भाग करा. एक भाग सुकं चिकनसाठी आणि एक भाग रस्सा चिकनसाठी वापरा.
advertisement
रस्सा चिकन बनवण्याची पद्धत
आता एक कुकरमध्ये तेल आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी घाला. आता यात अर्धे चिकनपिस आणि आपण बनवलेल्या मसाल्याचा अर्धाभाग घाला. यानंतर त्यात आवश्यकतेनुसार मीठ घाला, कारण आपण आधी थोडं मीठ घातलं होतं.आता त्यात तुम्हाला हवं तेवढं पाणी घाला आणि शिजवून घ्या. त्याला कांळा किंवा तांबडा असा रंग येईल.
advertisement
advertisement
सुकं चिकन बनवण्याची पद्धत
आता एका कढईत तेल घेऊन त्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबिरी घाला. याच मिश्रणनात थोडं मीठ घालून चांगलं परतून घ्या. टोमॅटो हलका भाजला की त्यात आपण तयार केलेला अर्धा मसाला घाला. सगळं चांगलं मिक्स करून घ्या आणि त्यात उरलेले चिकनपिस घाला. हे सगळं व्यवस्थित परतून घ्या आणि त्यात आपण बनवलेल्या रस्सा चिकनचा पळीभर रस्सा घालून शिजवून घ्या आणि त्यावर थोडी कोथिंबिर चिरून टाका. तुमचं सुक्क चिकन देखील तयार आहे.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Gavran Chicken Recipe : लाडक्या बायकोसाठी बनवा सुकं आणि रस्सा चिकन! टेंशन घेऊ नका, ही आहे सोपी रेसिपी
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement