Akshaye Khanna Controversy: 'माझे 21 लाख घेऊन तो लंडनला पळाला', 'धुरंधर' फेम अक्षय खन्नावर प्रसिद्ध दिग्दर्शकाचे खळबळजनक आरोप

Last Updated:
Akshaye Khanna Controversy: एका बाजूला अक्षयचं कौतुक होत असतानाच, दुसरीकडे इंडस्ट्रीतील एका लेखकाने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
1/6
मुंबई: बॉलिवूडमध्ये शांत, संयमी आणि कमालीची मॅच्युरिटी असलेला अभिनेता म्हणून अक्षय खन्ना ओळखला जातो. सध्या तो 'धुरंधर' सिनेमाच्या तुफान यशामुळे हवेत आहे. पण, एका बाजूला अक्षयचं कौतुक होत असतानाच, दुसरीकडे इंडस्ट्रीतील एका लेखकाने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई: बॉलिवूडमध्ये शांत, संयमी आणि कमालीची मॅच्युरिटी असलेला अभिनेता म्हणून अक्षय खन्ना ओळखला जातो. सध्या तो 'धुरंधर' सिनेमाच्या तुफान यशामुळे हवेत आहे. पण, एका बाजूला अक्षयचं कौतुक होत असतानाच, दुसरीकडे इंडस्ट्रीतील एका लेखकाने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "अक्षय खन्ना अतिशय लहरी आहे आणि त्याच्यामुळे अनेकांचं करिअर उद्ध्वस्त झालंय," असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
advertisement
2/6
'सेक्शन ३७५'चे लेखक मनीष गुप्ता यांनी एका मुलाखतीत अक्षय खन्नाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर मुद्दे मांडले आहेत. हे प्रकरण २०१७ सालातील आहे, जेव्हा 'सेक्शन ३७५' या गाजलेल्या सिनेमाचं काम सुरू होतं. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, अक्षयने या चित्रपटासाठी २ कोटी रुपये मानधन मागितलं होतं आणि त्यापैकी २१ लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून देण्यात आले होते.

3/6
गुप्ता यांचा आरोप आहे की, पैसे घेतल्यावर अक्षयने अचानक या सिनेमाकडे पाठ फिरवली आणि आपल्या तारखा 'द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या दुसऱ्या सिनेमाला देऊन तो थेट लंडनला रवाना झाला. यामुळे 'सेक्शन ३७५'च्या संपूर्ण टीमला तब्बल ६ महिने बसून राहावं लागलं.

4/6
केवळ तारखांचा घोळच नाही, तर अक्षय खन्नावर सेटवर राजकारण केल्याचाही ठपका मनीष गुप्ता यांनी ठेवला आहे. अक्षयला सेटवर प्रत्येक गोष्ट स्वतःच्या सोयीनुसार आणि मर्जीप्रमाणे हवी असायची. जेव्हा गुप्ता यांनी त्याच्या या अवास्तव मागण्यांना आणि हस्तक्षेप करण्याच्या वृत्तीला विरोध केला, तेव्हा अक्षयने चक्क निर्मात्यांवर दबाव टाकला.

5/6
गुप्ता म्हणतात,
गुप्ता म्हणतात, "मी या विषयावर ३ वर्षे मेहनत घेतली होती, १६० वेळा न्यायालयाच्या सुनावण्या प्रत्यक्ष पाहिल्या होत्या. पण अक्षयने निर्माते कुमार मंगत यांना गळ घातली आणि मला दिग्दर्शक पदावरून हटवायला लावलं. माझी ३ वर्षांची मेहनत त्याने क्षणात मातीमोल केली आणि मला फक्त लेखनाचं क्रेडिट देऊन बाजूला सारलं."
advertisement
6/6
अक्षय खन्ना सध्या 'दृश्यम ३'मधून बाहेर पडल्यामुळे आधीच चर्चेत होता. त्यात आता मनीष गुप्ता यांनी केलेल्या या आरोपांमुळे त्याच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे. इंडस्ट्रीत अक्षयला एक प्रायव्हेट व्यक्ती मानलं जातं, पण तो इतका डोमिनेटिंग असू शकतो, हे ऐकून चाहतेही थक्क झाले आहेत.

BMC Election : मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
  • आता अनेक प्रभागांतील लढतींचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.

  • मात्र, मतदानापूर्वीच महायुतीला दोन जागांवर मोठा धक्का बसला आहे.

  • दोन जागांवर महायुतीचे उमेदवार नाहीच.

View All
advertisement