Tips and Tricks : हळूहळू घर खाऊन टाकते ही कीड… पेस्ट कंट्रोल नाही, 'या' देशी उपायांनी वाळवीला घरातून करा टाटा-बायबाय
- Published by:Devika Shinde
Last Updated:
यांची फौज एकदा घरात आली की शांतपणे सर्व काही पोखरते. भिंती, कपाटं, सोफा, पलंग, कपडे, अगदी बिछान्यापर्यंत हे पोहोचतात. त्यांचा प्रसार इतक्या वेगाने होतो की कधी घराचं रूप बदलून जातं, ते कळतही नाही.
आपल्या घरात जर एखाद्या न दिसणाऱ्या शत्रूचा प्रवेश झाला, तर तो थोड्याच काळात भिंतींपासून फर्निचरपर्यंत सर्व काही संपवू शकतो आणि तो शत्रू म्हणजे वाळवी ज्याला काही लोक दीमक असं देखील म्हणतात. हे हे दिसायला छोटे असतात, पण यांची फौज एकदा घरात आली की शांतपणे सर्व काही पोखरते. भिंती, कपाटं, सोफा, पलंग, कपडे, अगदी बिछान्यापर्यंत हे पोहोचतात. त्यांचा प्रसार इतक्या वेगाने होतो की कधी घराचं रूप बदलून जातं, ते कळतही नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
वाळवी घरात कशी राहते?वाळवी प्रामुख्याने अंधाऱ्या जागी राहतात म्हणजेच दरवाजे, खिडक्या, फर्निचर किंवा भिंतींच्या आतल्या बाजूस. ते बाहेरून काहीच चिन्ह दाखवत नाहीत, पण लाकडाच्या आतील भागावर आक्रमण करून हळूहळू सगळं पोखरतात. हे कीटक भिंतींमधील चिखलाच्या बारीक नळ्यांमधून (mud tubes) प्रवास करतात. या नळ्या त्यांच्या घरट्यांना आणि अन्नाच्या जागांना जोडतात. त्यामुळे घरात कुठेही अशा चिखलाच्या रेषा दिसल्या, तर ते धोक्याचं चिन्ह असतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


