advertisement

PAK vs IND : पावसामुळे मॅच रद्द झाली तर सुपर 8 मध्ये कोण पोहोचणार? भारत की पाकिस्तान? पाहा रोमांचक समीकरण

Last Updated:
India vs Pakistan Rain Prediction : श्रीलंकेच्या हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रविवारी हवामानात मोठे बदल होऊन भारत पाकिस्तान सामन्यावर पावसाची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
1/7
भारत पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा थरार संध्याकाळी 7 वाजता म्हणजे मॅच सुरू होण्यापूर्वीच्या काळात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

2/7
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 15 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजेपर्यंत आकाश निरभ्र राहील, परंतु त्यानंतर पावसाचे आगमन होऊ शकते. त्यामुळे मॅचच्या सुरूवातीलाच पाऊस सामन्यात खोडा घालू शकतो.

3/7
रात्री 8 नंतर हवामान पुन्हा सुधारू शकते, असंही भाकीत वर्तवण्यात आलं आहे. त्यामुळे हा सामना पूर्णपणे रद्द होणार नाही, मात्र पावसामुळे ओव्हरची कपात किंवा पावसामुळे खेळात वारंवार अडथळे येण्याची चिन्हे दिसत आहेत.

4/7
कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर पाऊस थांबल्यानंतर अवघ्या 45 ते 60 मिनिटांत मैदान पुन्हा खेळण्यायोग्य करण्याची क्षमता येथील कर्मचाऱ्यांकडे आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. मात्र पाकिस्तानला टेन्शन आलंय.

5/7
जर पावसामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला जाईल. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजसाठी कोणताही 'रिजर्व डे' ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीत तारांबळ उडालीये.

6/7
सध्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी असून पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांचे प्रत्येकी 4 गुण असले तरी भारताचा रन रेट पाकिस्तानपेक्षा बराच चांगला आहे, ज्यामुळे भारताचे पारडं जड मानलं जात आहे.

7/7
दरम्यान, जर भारताविरूद्धचा सामना पावसामुळे किंवा काही कारणास्तव झाला नाही आणि ड्रॉ झाला तर पाकिस्तानला सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी काहीही करून नेदरलँडला अखेरच्या सामन्यात हरवावच लागेल.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement