advertisement

Coconut Oil : केवळ केसांसाठी नाही, खोबरेल तेलाचे आहेत भरपूर फायदे, वाचा सविस्तर

Last Updated:

नारळाच्या तेलात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के सारखे पोषक घटक असतात तसेच अँटीऑक्सिडंट्स, फॅटी एसिड, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. पाहूयात नारळाच्या तेलाचे फायदे.

News18
News18
मुंबई : नारळाचं तेल म्हणजे भारतातल्या बहुतांश घरांमधला अविभाज्य घटक. हे तेल आरोग्यासाठी, केसांसाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. भारतातल्या काही भागात नारळाचं तेल जेवणासाठी वापरलं जातं. अन्नाची चव खमंग होतेच तसंच हे तेल लावल्यानं त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात आणि ओलावा टिकून राहतो.
नारळाच्या तेलात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के सारखे पोषक घटक असतात तसेच अँटीऑक्सिडंट्स, फॅटी एसिड, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. पाहूयात नारळाच्या तेलाचे फायदे.
ब्लॅकहेड्स - नाकावरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी नारळ तेलाचा वापर करु शकता. नारळाच्या तेलात थोडी साखर मिसळा आणि स्क्रब तयार करा. हे मिश्रण नाकाला लावा आणि दोन-तीन मिनिटं हलक्या हातानं घासा. असं केल्यानं कोणत्याही वेदनेशिवाय ब्लॅकहेड्स निघू शकतात.
advertisement
काळी वर्तुळं - डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी नारळाचं तेल खूप उपयुक्त ठरू शकतं. हे करण्यासाठी, कॉफी पावडरमधे नारळाच्या तेलाचा एक थेंब मिसळा आणि पेस्ट बनवा. मिश्रण डोळ्यांखालील भागात लावा आणि थोड्या वेळानं चेहरा धुवा. यामुळे काळी वर्तुळं कमी होण्यास मदत होते आणि त्वचा मऊ राहते.
advertisement
पिग्मेंटेशन - नारळाच्या तेलात थोडी बेकिंग पावडर मिसळून लोशन बनवा. हे लोशन मान, कोपर, गुडघे किंवा काळ्या त्वचेच्या इतर कोणत्याही भागात लावा. काही मिनिटांनी ते स्वच्छ पाण्यानं धुवा.
दात - दातांवरील पिवळा थर काढून टाकण्यासाठी आणि मोत्यांसारखे चमकदार दिसण्यासाठी नारळ तेल वापरू शकता. एक चमचा नारळ तेलात चिमूटभर हळद मिसळा. आता ही पेस्ट टूथब्रशला लावा आणि दात घासा. हे नियमितपणे केल्यानं दात नैसर्गिकरित्या पांढरे होतील.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Coconut Oil : केवळ केसांसाठी नाही, खोबरेल तेलाचे आहेत भरपूर फायदे, वाचा सविस्तर
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement