advertisement

Skin Care : हिवाळ्यात सांभाळा त्वचेचा पोत, कोलेजन वाढीसाठी प्या नैसर्गिक पेयं

Last Updated:

कोलेजन नावाचं प्रथिन त्वचा चांगली मऊ राखण्यासाठी आवश्यक असतं. त्वचेचा पोत चांगला राहावा यासाठी हे प्रथिन महत्त्वाचं आहे. बदलत्या हवामानात, कोलेजनचं योग्य प्रमाण असणं गरजेचं. आवळा रस, गाजर, बीट आणि आल्याचा रस, डाळिंबाचा रस, लिंबू पाणी आणि मध ही चार पेयं कोलेजन वाढण्यासाठी आणि तुमची त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील.

News18
News18
मुंबई : पाऊस लांबला आणि त्यानंतर ऑक्टोबर हिट न जाणवता, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच हवामानात गारवा जाणवायला सुरुवात झाली. हवा हळूहळू थंड होते आहे. हिवाळ्याचा पहिला परिणाम आपल्या त्वचेवर जाणवतो. थंड हवेमुळे त्वचेतला ओलावा कमी होतो आणि त्वचा कोरडी होते.
कोलेजन नावाचं प्रथिन त्वचा चांगली मऊ राखण्यासाठी आवश्यक असतं. त्वचेचा पोत चांगला राहावा यासाठी हे प्रथिन महत्त्वाचं आहे. बदलत्या हवामानात, कोलेजनचं योग्य प्रमाण असणं गरजेचं. आवळा रस, गाजर, बीट आणि आल्याचा रस, डाळिंबाचा रस, लिंबू पाणी आणि मध ही चार पेयं कोलेजन वाढण्यासाठी आणि तुमची त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील.
advertisement
आवळा रस - आवळ्याचा रस चमकदार त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. 'व्हिटॅमिन सी' साठी आणि कोलेजन उत्पादन वाढवण्यासाठी आवळ्याचा रस चांगला पर्याय आहे. दररोज सकाळी आवळ्याचा रस किंवा आवळ्याची पावडर पाण्यात मिसळून घेऊ शकता.
गाजर, बीट आणि आल्याचा रस - हे तिन्ही घटक त्वचेसाठी पोषक आहेत. यात भरपूर जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. त्वचा चांगली राखण्यासाठी हे तिन्ही घटक महत्त्वाचे आहेत. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत, खराब झालेल्या त्वचेला दुरुस्त करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर काढले जातात.
advertisement
डाळिंबाचा रस - त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, डाळिंबाचा रस प्या. यामुळे लाल रक्तपेशी वाढतात आणि रक्ताभिसरण सुधारतं. कोलेजन उत्पादन वाढवण्यासाठी याची मदत होते. हा रस नियमित प्यायल्यानं नैसर्गिक चमक वाढण्यास मदत होते.
advertisement
लिंबू पाणी आणि मध - लिंबू पाणी आणि मध शरीरातील अशुद्धता आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. कोलेजन उत्पादन वाढण्यासाठीही याची मदत होते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : हिवाळ्यात सांभाळा त्वचेचा पोत, कोलेजन वाढीसाठी प्या नैसर्गिक पेयं
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement