Eggs : हिवाळा आहे म्हणून जास्त अंडी खाऊ नका, वाचा जास्त अंडी खाल्ल्यानं कसं होतं नुकसान

Last Updated:

अंडी विशेषतः हिवाळ्यात खाल्ल्यानं शरीर उबदार राहण्यास मदत होते. पण अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्यानं फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. कुठत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असू शकतो. अंड्यांच्या बाबतीतही हेच खरं आहे. म्हणूनच तब्येत चांगली राहावी म्हणून दररोज खूप जास्त अंडी खात असाल तर त्याचे अनेक तोटे असू शकतात.

News18
News18
मुंबई : संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे ! हे आपण सर्वांनीच ऐकलंय. कारण अंडी हा पौष्टिक पर्याय आहे. आता हिवाळा सुरु होतोय म्हणजे अंडी खाण्याचं प्रमाण वाढणार. प्रथिनांचा समृद्ध स्रोत म्हणजे अंडी. अंडी हा नेहमीच एक आरोग्यदायी पर्याय. म्हणूनच आरोग्य तज्ज्ञांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण अंडी खाण्याची शिफारस करतात.
अंडी विशेषतः हिवाळ्यात खाल्ल्यानं शरीर उबदार राहण्यास मदत होते. पण अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्यानं फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. कुठत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असू शकतो. अंड्यांच्या बाबतीतही हेच खरं आहे. म्हणूनच तब्येत चांगली राहावी म्हणून दररोज खूप जास्त अंडी खात असाल तर त्याचे अनेक तोटे असू शकतात.
जास्त अंडी खाण्याचे तोटे -
advertisement
पचनाच्या समस्या - काहींना जास्त अंडी खाल्ल्यानं पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे गॅस, पोटदुखी आणि अपचन होऊ शकतं. पण ज्यांना अंडी आवडत नाहीत त्यांना पोटाच्या समस्या अधिक जाणवू शकतात. म्हणून, जास्त अंडी खाणं टाळणं महत्वाचं आहे. शिवाय, जास्त चरबीयुक्त पदार्थांसह ते खाल्ल्यानं बद्धकोष्ठता होऊ शकते.
advertisement
ऍलर्जी - अंडी खाल्ल्यामुळे ऍलर्जी येऊ शकते हे फार कमी जणांना माहिती आहे. जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्यानं ऍलर्जी होऊ शकते, ज्यामधे गंभीर अ‍ॅनाफिलेक्सिसचा समावेश आहे. अंगावर पित्ताच्या गाठी उठणं, सूज, पुरळ, एक्झिमा, श्वास घेण्यास त्रास होणं, नाक वाहणं, डोळे लाल होणं किंवा डोळ्यातून पाणी येणं, नाक बंद होणं, चक्कर येणं किंवा छातीत जडपणा यासारखी कोणतीही लक्षणं जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. तसंच, जर तुम्हाला अंडी खाल्ल्यानंतर ही लक्षणं जाणवत असतील तर ती खाणं टाळा.
advertisement
Food born disease - कच्ची किंवा कमी शिजवलेली अंडी खाल्ल्यानं साल्मोनेला इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. यामुळे मळमळ, उलट्या, जुलाब आणि पोटदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. या संसर्गास कारणीभूत असलेले जीवाणू सामान्यतः कोंबड्या आणि इतर कोंबड्यांद्वारे अंड्यांमधे पसरतात.
कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते - अंड्यांमधे आहारातील कोलेस्टेरॉल असतं, ज्यामुळे काहींमधे कोलेस्टेरॉल वाढू शकतं. अंडी एलडीएल 'वाईट कोलेस्टेरॉल' लक्षणीयरीत्या वाढवत नाहीत, पण 'चांगलं कोलेस्टेरॉल' अधिक वाढवतात असं एका अभ्यासातून आढळून आलं आहे. म्हणून, उच्च कोलेस्टेरॉल पातळी असलेल्यांनी दररोज जास्त अंडी खाणं टाळावं असा सल्ला डॉक्टर देतात.
advertisement
मधुमेहाचा धोका - अंडी हा एक पौष्टिक पर्याय मानला जात असला तरी, त्यात बायोटिन असतं, जे इन्सुलिन स्रावासाठी आवश्यक असतं. म्हणून, जास्त अंडी खाल्ल्यानं मधुमेहाचा धोका वाढू शकतो. आठवड्यातून सात किंवा त्याहून अधिक अंडी खाणाऱ्या पुरुषांना टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका 58 टक्के जास्त असतो. डायबिटीज केअर जर्नलमधे प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात हे आढळून आलं आहे.
advertisement
दिवसातून किती अंडी खाणं योग्य ?
हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या आकडेवारीनुसार, दिवसातून एक अंड खाण्यात कोणतीही हानी नाही. पण काहींनी जास्त अंडी खाणं टाळावं. उच्च कोलेस्ट्रॉल पातळी असलेल्यांनी आठवड्यातून 2-3 अंडी खावीत. दरम्यान, हृदयरोग असलेल्यांनी आठवड्यातून 3-4 पेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत. मधुमेह असलेल्यांनी आठवड्यातून 5 पर्यंत अंडी खावीत.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Eggs : हिवाळा आहे म्हणून जास्त अंडी खाऊ नका, वाचा जास्त अंडी खाल्ल्यानं कसं होतं नुकसान
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement