Uric Acid : युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी हे उपाय लक्षात ठेवा, प्रकृती राहिल चांगली
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढल्यामुळे सांधेदुखी, सूज आणि ताठरपणा या समस्या जाणवतात. हा त्रास टाळण्यासाठी किंवा असलेला त्रास कमी करण्यासाठी दुधी, कारलं, गाजर, काकडी, टोमॅटो हे पदार्थ उपयुक्त ठरतात.
मुंबई : युरिक अॅसिड म्हणजे आपल्या शरीरात तयार होणारा एक नैसर्गिक टाकाऊ पदार्थ आहे. म्हणून, मूत्रपिंड ते रक्तातून करतात म्हणजेच गाळून विलग करतात. पण, काही प्रमाणात युरिक अॅसिड शरीरातच राहतं. आपल्या शरीरात युरिक अॅसिड जमा होतं तेव्हा शरीरात त्याचे परिणाम जाणवतात.
शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढल्यामुळे सांधेदुखी, सूज आणि ताठरपणा या समस्या जाणवतात. हा त्रास टाळण्यासाठी किंवा असलेला त्रास कमी करण्यासाठी दुधी, कारलं, गाजर, काकडी, टोमॅटो हे पदार्थ उपयुक्त ठरतात.
दुधी - दुधीला युरिक अॅसिडचा बचावकर्ता म्हणणे चुकीचे ठरणार नाही. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त आणि प्युरिनचं प्रमाण कमी असतं. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर जातात. युरिक अॅसिडमुळे ते विरघळतात आणि मूत्रपिंडांद्वारे काढून टाकले जातात. यामुळे पचन चांगलं होतं आणि वजन कमी करण्यास मदत होते.
advertisement
कारलं - कारल्याची चव कडू असते पण कारलं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारल्यामधे दाहक-विरोधी गुणधर्म असतात, यामुळे सांध्यांची सूज आणि संधिवातामुळे होणारं दुखणं कमी होत. चयापचय योग्य राखून युरिक अॅसिड नियंत्रित करण्यास मदत करते.
गाजर - गाजरात बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. शरीरातील यूरिक अॅसिड संतुलित करण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी गाजर उपयुक्त आहे. गाजरातील अल्कधर्मी घटक शरीरातील आम्ल-बेस संतुलन राखण्यास मदत करतात, जे यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी आवश्यक आहे.
advertisement
काकडी - काकडी युरिक अॅसिड कमी करण्यास मदत करते. त्यात अंदाजे 95% पाणी असतं. युरिक अॅसिड पातळ करण्यास आणि लघवीद्वारे शरीरातून काढून टाकण्यासाठी काकडी उपयुक्त आहे.
टोमॅटो - टोमॅटो हे व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. टोमॅटोमधील दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे सांध्यांची सूज कमी होते. शिवाय, त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असते, युरिक अॅसिड बाहेर काढण्यासाठी याची मदत होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 08, 2025 8:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Uric Acid : युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी हे उपाय लक्षात ठेवा, प्रकृती राहिल चांगली


