Sangli News: Thar, फॉर्च्युनर जिंकणाऱ्या बैलगाडा शर्यतीत घडली वाईट घटना, 12 तासांनंतर माहिती समोर

Last Updated:

सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील माळरानावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडी शर्यतीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

बोरगावात बैलगाडी शर्यतीच्या मैदानात एकाचा एकाचा गंभीर जखमी होऊन अपघाती मृत्यू 
बोरगावात बैलगाडी शर्यतीच्या मैदानात एकाचा एकाचा गंभीर जखमी होऊन अपघाती मृत्यू 
सांगली: सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील माळरानावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडी शर्यतीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अंबाजी शेखू चव्हाण (वय 60) बुद्देहाळ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर नय्युम आयुब पठाण (वय 25) राहणार फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे जखमीचे नाव आहे.
बैलगाडा शर्यतीत घडलेल्या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झालेली आहे. मैदानावर सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ या गावातील अंबाजी शेखु चव्हाण हे बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी आलेले होते. अंबाजी चव्हाण हे चहा पीत बाजूला उभे असताना आदत गटातील दोन ते चार बैलगाड्या उधळून मैदानातून बाहेर पडल्या, यामध्ये अंबाजी चव्हाण यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे.
advertisement
तर या शर्यतीमध्ये वेगवेगळा अपघातांमध्ये 13 ते 15 जण जखमी झाल्याची माहिती समजते. जखमी झालेले सर्वजण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांची नावे समजू शकली नाहीत. तर यातील नयुम आयुब पठाण असे एका जखमीचे नाव समोर येत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sangli News: Thar, फॉर्च्युनर जिंकणाऱ्या बैलगाडा शर्यतीत घडली वाईट घटना, 12 तासांनंतर माहिती समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement