Prabhadevi Bridge: प्रभादेवी पुलाबाबत महत्त्वाचं अपडेट, पश्चिम रेल्वेकडून तयारी सुरू, आठच दिवसांत निर्णय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Prabhadevi Bridge: प्रभादेवी आणि परळ परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. पश्चिम रेल्वे प्रभादेवी पुलाबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
मुंबई: प्रभादेवी आणि परळ परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी स्थानकाजवळ उभारलेला नवीन पादचारी पूल आता सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला होणार आहे. आतापर्यंत हा पूल स्थानकाच्या तिकिटिंग झोनमध्ये असल्याने फक्त रेल्वे प्रवाशांनाच वापरण्यास परवानगी होती. मात्र पश्चिम रेल्वेने हा पूल ‘नॉन कमर्शियल झोन’ करण्याचा निर्णय घेतला असून पुढील आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्रभादेवी स्थानकाजवळचा हा पूल पूर्व-पश्चिम दिशेने दोन्ही रेल्वे मार्ग ओलांडतो आणि थेट प्रभादेवी स्थानकाशी जोडलेला आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम दिशेने प्रवास करणारे तसेच परळ आणि केईएम रुग्णालयाच्या दिशेने जाणारे नागरिकांसाठी हा पूल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रभादेवीचा जुना पूल सुरक्षेच्या कारणास्तव काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना स्टेशन परिसर ओलांडण्यासाठी मोठा फेरा मारावा लागत होता. अनेकांना दैनंदिन प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत होता. शाळा, कार्यालये आणि रुग्णालयात जाणेही कठीण बनले होते.
advertisement
आता नवीन पूल सर्वांसाठी खुला होणार असल्याने ही समस्या पूर्णपणे दूर झाली आहे. नागरिकांना स्टेशन परिसर सहज पार करता येईल आणि प्रवासात वेळ वाचेल. या निर्णयामुळे प्रभादेवी आणि परळ परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्थानिकांनी पश्चिम रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत केले असून लवकरात लवकर पूल सुरू करण्याची मागणीही केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2025 9:12 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Prabhadevi Bridge: प्रभादेवी पुलाबाबत महत्त्वाचं अपडेट, पश्चिम रेल्वेकडून तयारी सुरू, आठच दिवसांत निर्णय?


