Weather Update: आता स्वेटर बाहेर काढा, मुंबई-ठाण्याची हवा बदलली, कोकणात थंडी, आजचं हवामान अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात बदल जाणवत असून कोकणात हवापालट झाली आहे. मुंबई-ठाण्यात तापमानात घट झाली असून गारठा वाढला आहे.
राज्यात अखेर गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. गेले काही महिने सततच्या पावसाने त्रस्त झालेल्या महाराष्ट्रात आता आकाश साफ दिसू लागले आहे. कोकण पट्ट्यात आणि मुंबई परिसरात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असून हवामान कोरडे झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आज कोणत्याही पावसाची शक्यता नाही.
advertisement
मुंबईत आजचे हवामान पूर्णपणे कोरडे आणि प्रसन्न असणार आहे. सकाळी व संध्याकाळी थंड वारा जाणवतोय, तर दुपारी हलकी उष्णता वाढेल. दिवसाचे कमाल तापमान सुमारे 30 ते 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 22 अंशांपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. पावसाचे कोणतेही संकेत नाहीत आणि आकाश स्वच्छ व ढगविरहित राहणार आहे.
advertisement
ठाणे व नवी मुंबई परिसरातही आज साफ आकाश आणि कोरडे हवामान कायम राहणार आहे. सकाळी तापमान 18 ते 20 अंशांदरम्यान, तर दुपारी 32 ते 34 अंशांपर्यंत जाईल. गेल्या काही आठवड्यांपासूनचा सततचा दमटपणा कमी झाला असून वातावरणात थोडा गारवा जाणवतो आहे. सकाळी वाऱ्यासोबत हलका थंड स्पर्श जाणवतोय, तर रात्री पुन्हा थंड हवामानाचा अनुभव मिळेल.
advertisement
पालघर जिल्ह्यात आज कोरडे हवामान अपेक्षित आहे. तापमानात घट होत असून सकाळी 16 अंश सेल्सिअसपर्यंत थंडी जाणवेल. दुपारच्या सुमारास तापमान 31 अंशांपर्यंत जाईल. गेल्या काही दिवसांत पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर आता हवेत थंडीची चाहूल स्पष्टपणे जाणवते आहे. शेतकऱ्यांसाठी हे हवामान सोयीचे ठरत असून वातावरण आनंददायक आहे.
advertisement
कोकण किनारपट्टीवरील या जिल्ह्यांमध्ये आजचे हवामानही पूर्णपणे कोरडे असणार आहे. तापमान 20 ते 33 अंशांदरम्यान, तर आकाश अंशतः स्वच्छ राहील. समुद्रकिनाऱ्यांवर हलका वारा वाहत असल्याने सकाळी आणि संध्याकाळी गारवा जाणवेल. दिवसा सूर्यप्रकाश वाढल्यामुळे दुपारी थोडी उष्णता असली तरी हवामान एकूणात सुखद आहे. पावसाने माघार घेतल्याने कोकणात आता थंडीचा हंगाम सुरू झाला आहे.


