25,000 रुपयांहून कमीमध्ये मिळतोय स्नॅपड्रॅगन प्रोसेसरचा मोटोरोलाचा नवा फोन! पाहा सेल कधी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
मोटोरोला एज 70 फ्यूजन भारतात लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये 7000mAh बॅटरी, स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 प्रोसेसर, 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 50MP Sony LYTIA कॅमेरा मिळतोय याची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये आहे.
मुंबई : मोटोरोलाने भारतात आपला नवा मिड-प्रीमियम स्मार्टफोन मोटोरोला एज 70 फ्यूजन लॉन्च केला आहे. कंपनीने हा डिव्हाइस दमदार बॅटरी, हाय-रिफ्रेश-रेट डिस्प्ले आणि एआय फीचर्ससह सादर केला आहे. फोनची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ज्यामुळे हा सेगमेंटमध्ये एक मजबूत ऑप्शन बनू शकतो. मोटोरोलानुसार हा स्मार्टफोन ऑनलाइन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट, मोटोरोलाच्या ऑफिशियल वेबसाइट आणि ऑफलाइन रिटेल स्टोर्सच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
किंमत आणि ऑफर
मोटोरोला एज 70 फ्यूजन तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे
- 8GB RAM + 128GB स्टोरेज – ₹26,999
- 8GB RAM + 256GB स्टोरेज – ₹29,999
- 12GB RAM + 256GB स्टोरेज – ₹32,999
खरंतर बँक आणि एक्सचेंज ऑफर्सनंतर याच्या प्रभावी किंमती कमी होतात. ऑफरनंतर 8GB+128GB व्हेरिएंट 24,999 रुपये, 8GB+256GB 27,999 रुपयांत आणि 12GB+256GB मॉडल 30,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकेल. कंपनी HDFC Bank आणि Axis Bank च्या क्रेडिट कार्डवर 2,000 रुपयांचा इंस्टंड डिस्काउंटही देत आहे.
advertisement
विक्री आणि उपलब्धता
मोटोरोलाने सांगितलं की, या स्मार्टफोनची अर्ली बर्ड सेलनंतर ओपन सेल 12 मार्चपासून फ्लिपकार्ट, मोटोरोला.इन आणि ऑफलाइन स्टोर्सवर सुरु होईल. फोन तीन पँटोन-क्यूरेटेड कलर ऑप्शन - ब्लू सर्फ, कंट्री एयर आणि सिलिहॉयटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
advertisement
डिस्प्ले आणि परफॉर्मेंस
मोटोरोला एज 70 फ्यूजनमध्ये 6.78-इंचाचा 1.5K क्वाड-कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 144Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्टसह येतो. याची पीक ब्राइटनेस 5200 निट्सपर्यंत जाते आणि स्क्रीनला Corning Gorilla Glass 7i ने प्रोटेक्ट केले आहे.
परफॉर्मेंससाठी यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 प्रोसेसर दिला आहे. ज्यासह 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेजचं ऑप्शन मिळतं. चांगले थर्मल मॅनेजमेंटसाठी फोनमध्ये वेपर-चेंबर कूलिंग सिस्टमही दिली आहे.
advertisement
कॅमेरा आणि बॅटरी
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP चा Sony LYTIA 710 मेन कॅमेरा OIS सह दिला आहे. या व्यतिरिक्त 13MP चा अल्ट्रा-वाइड+मायक्रो कॅमेरा आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोन सर्व लेन्सशी 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.
advertisement
पॉवरसाठी फोनमध्ये 7000mAh ची मोठी सिलिकॉन-कार्बन बॅटरी दिली आहे. जी 68W TurboPower फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
AI आणि इतर फीचर्स
हा स्मार्टफोन अँड्रॉइड 16 वर बेस्ड हॅलो UI वर चालतो. यात मोटो एआय, गुगल जेमिनी, मायक्रोसॉफ्ट कोपायलट आणि पर्प्लेक्सिटी एआय देखील समाविष्ट आहेत. शिवाय, फोनमध्ये IP68 आणि IP69 वॉटर रेझिस्टन्स, MIL-STD-810H ड्यूरेबिलिटी सर्टिफिकेशन, Wi-Fi 6E, ब्लूटूथ 6.0 आणि NFC आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 1:47 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
25,000 रुपयांहून कमीमध्ये मिळतोय स्नॅपड्रॅगन प्रोसेसरचा मोटोरोलाचा नवा फोन! पाहा सेल कधी






