advertisement

पुणेकरांनो, ऑनलाईन वस्तू मागवताय? जरा जपून! पार्सल दिलं, प्यायला पाणी मागितलं अन् मग तरुणीसोबत धक्कादायक कांड

Last Updated:

डिलिव्हरी बॉय श्रीधर कांबळे पार्सल घेऊन तिच्या घरी पोहोचला. तरुणीनं दरवाजा उघडून पार्सल घेतलं. त्यानंतर त्याने तरुणीकडे पिण्यासाठी पाणी मागितलं.

डिलिव्हरी बॉयने केला विनयभंग  (प्रतिकात्मक फोटो)
डिलिव्हरी बॉयने केला विनयभंग (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुण्यातील शिवाजीनगर परिसरात एका डिलिव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ६ मार्च रोजी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
शिवाजीनगर भागात राहणाऱ्या एका तरुणीनं 'पोर्टर' (Porter) ॲपद्वारे सामान मागवलं होतं. सायंकाळी पाचच्या सुमारास डिलिव्हरी बॉय श्रीधर कांबळे पार्सल घेऊन तिच्या घरी पोहोचला. तरुणीनं दरवाजा उघडून पार्सल घेतलं. त्यानंतर त्याने तरुणीकडे पिण्यासाठी पाणी मागितलं. तरुणीने माणुसकीच्या नात्यानं त्याला पाणी दिलं, मात्र याच संधीचा फायदा घेत त्यानं तिच्या हाताला स्पर्श केला आणि "तू खूप सुंदर दिसतेस," असं म्हणत गैरवर्तन केलं.
advertisement
पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
या घटनेवेळी घरात तरुणीची सासू आणि तिचं बाळ उपस्थित होते. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तात्काळ आपल्या पतीला याची माहिती दिली. त्यानंतर पीडित तरुणीनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी डिलिव्हरी बॉय श्रीधर कांबळे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, शिवाजीनगर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
advertisement
ऑनलाइन ॲपवरून सेवा घेताना सुरक्षेच्या नियमांचे पालन किती गरजेचे आहे, हेच या घटनेवरून अधोरेखित होत आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून, लवकरच आरोपीला शिक्षा दिली जाईल. मात्र, नागरिकांनी सावध राहाणं गरजेचं आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो, ऑनलाईन वस्तू मागवताय? जरा जपून! पार्सल दिलं, प्यायला पाणी मागितलं अन् मग तरुणीसोबत धक्कादायक कांड
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement