आरडा ओरडा करून फुटेज मिळवलं, रुचिता जामदारला Bigg Bossच्या घरातून बाहेरचा रस्ता! ओक्साबोक्शी रडली, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 - Ruchita Jamdar : रुचिता जामदारने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यापासून तिच्या आक्रमक स्वभावामुळे ती सतत चर्चेत राहिली. अनेक टास्कमध्ये ती इतर स्पर्धकांशी जोरदार वाद घालताना दिसली.
Bigg Boss Marathi 6 च्या घरात स्पर्धकांमधील वाद, भांडणं आणि टास्क नेहमीच चर्चेत असतात. मागील आठवड्यात घरात तीन वाईल्ड कार्ड सदस्य आले. त्यानंतर या आठवड्यात प्रेक्षकांना मोठा धक्का बसणार आहे. या आठवड्यात घरातून एका स्पर्धकाची एक्झिट झाली आहे आणि ती स्पर्धक रुचिता जामदार असल्याची माहिती समोर आली आहे. रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तब्बल आठ आठवड्यांनी रुचिता बिग बॉस मराठी 6 च्या घरातून बाहेर आली आहे.
रुचिता जामदारने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यापासून तिच्या आक्रमक स्वभावामुळे ती सतत चर्चेत राहिली. अनेक टास्कमध्ये ती इतर स्पर्धकांशी जोरदार वाद घालताना दिसली. घरात अनेकदा तिचा आवाज चढलेला पाहायला मिळाला. तिच्या भाषेवरून तिला ट्रोल करण्यात आलं. रुचिताने आरडा ओरडा करूनच जास्त फुटेज मिळवल्याचंही म्हटलं गेलं. रुचिताच्या या वागण्यामुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं. एवढंच नाही तर घरातील इतर स्पर्धकांनीही अनेकदा तिच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे रुचिता घराबाहेर जावी अशी मागणीही काही प्रेक्षकांकडून होत होती.
advertisement
शोचा होस्ट रितेश देशमुखने देखील अनेकदा रुचिताच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली होती. तर दुसरीकडे रुचिता आणि विशाल यांच्यात सुरू असलेल्या नात्याचीही बाहेर खूप चर्चा होती. दरम्यान नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये घरातील सगळ्या सदस्यांना एलिमिनेशनचा धक्का मिळाल्याचं दिसतंय. रितेश देशमुख म्हणतो, "जेव्हा जेव्हा घरात गेमला हलकं घेतलं जातं तेव्हा तेव्हा मी आणि बिग बॉस अॅक्शन घेतो. या क्षणी घरातील एलिमिनेशन होणार आहे."
advertisement
advertisement
प्रोमोमध्ये घरातील वातावरण खूप भावूक झालेलं दिसतं. विशाल आणि रुचिता दोघेही रडताना दिसतात. सागर रुचिताला मिठी मारून रडत असल्याचंही व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. दुसरीकडे विशाल भावूक झाल्याचं पाहून राकेश त्याला धीर देताना दिसतोय. व्हिडिओच्या शेवटी रितेश देशमुख, "बाहेर या, मी तुमची वाट पाहतोय", असं म्हणतो. यानंतर रुचिता ओक्साबोक्सी रडताना दिसतेय.
advertisement
दरम्यान रुचिता जामदार खरंच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे का, याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत असून त्यात रुचिता शोमधून बाहेर पडल्याचा दावा केला जात आहे. काही प्रेक्षकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर काहींनी तिच्या गेमबद्दल मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे आगामी भागात नेमकं काय घडणार आणि रुचिता खरंच घराबाहेर पडली आहे का हे पाहणं इंट्रेस्टिंग ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 1:00 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
आरडा ओरडा करून फुटेज मिळवलं, रुचिता जामदारला Bigg Bossच्या घरातून बाहेरचा रस्ता! ओक्साबोक्शी रडली, VIDEO









