Mumbai Police : 'बुमराह हाय ना आपल्याकडं...', पोलीस कर्मचाऱ्याची भविष्यवाणी तंतोतंत ठरली खरी! Video पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mumbai Police Predicted accurately : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मॅचमध्ये मुंबईतील पोलीस कर्मचारी सुद्धा क्रिकेटप्रेमींइतकेच उत्साही दिसले होते. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
Mumbai Police seems to passionate about cricket : भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. वानखेडेवर टीम इंडियाला जबरदस्त सपोर्ट पहायला मिळाला. दुसरीकडे मुंबई पोलीस देशाची सेवा बजावत नसताना बाकी भारतीयांप्रमाणेच क्रिकेटचा आनंद लुटण्यात मग्न असतात. क्रिकेटबद्दलचे त्यांचे प्रेम आणि जिद्द ही कोणत्याही सामान्य चाहत्यापेक्षा कमी नाही. सध्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मॅचमध्ये मुंबईतील पोलीस कर्मचारी सुद्धा क्रिकेटप्रेमींइतकेच उत्साही दिसले होते. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांची भविष्यवाणी खरी ठरली
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुंबई पोलिसांची एका तरुणाने मुलाखत घेतली. यामध्ये मरिन ड्राईव्ह परिसरात काही पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात होते. त्यावेळी एका तरुणीने थेट पोलिसांना त्यांचं सामन्याबद्दलचं मत विचारलं. त्यावेळी पोलिसांनी टीम इंडिया जिंकणार असल्याची भविष्यवाणी केली. आपल्याकडे जसप्रीत बुमराह आहे ना... म्हणत त्यांनी टीम इंडियावर विश्वास दाखवला. पोलीस कर्मचाऱ्यांची भविष्यवाणी खरी ठरली अन् टीम इंडियाने बुमराहच्या जोरावर विजय मिळवला.
advertisement
advertisement
मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
वानखेडेवर झालेल्या इंडियाविरुद्ध इंग्लंड हाय-व्होल्टेज मॅचसाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. ड्युटीवर असताना सुरक्षेची जबाबदारी पार पाडण्यासोबतच, मैदानावर चालणाऱ्या प्रत्येक बॉलवर त्यांची नजर असते. चाहत्यांचा उत्साह आणि पोलीसांची सतर्कता यामुळे स्टेडियममधील वातावरण सध्या पाहण्यासारखे झालं होतं.
कामाचा ताण असूनही खेळाप्रती निष्ठा
advertisement
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून सुद्धा क्रिकेटशी संबंधित मजेशीर पोस्ट शेअर केल्या गेल्या होत्या. "आम्ही तुमची सुरक्षा करू, तुम्ही टीम इंडियाला सपोर्ट करा," असा संदेश त्यांनी चाहत्यांना दिला आहे. कामाचा ताण असूनही खेळाप्रती असलेली त्यांची ही निष्ठा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 1:25 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Police : 'बुमराह हाय ना आपल्याकडं...', पोलीस कर्मचाऱ्याची भविष्यवाणी तंतोतंत ठरली खरी! Video पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान








