'...तर तुला ठार करेन', विखे पाटलांच्या निकटवर्तीला थेट दाखवली पिस्तूल, नगरला हादरवणारी घटना!
- Reported by:Harish Dimote
- Written by:Ravindra Mane
Last Updated:
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एका निकटवर्तीयाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
हरीष दिमोटे, प्रतिनिधी अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. इथं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एका निकटवर्तीयाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आरोपीनं थेट पिस्तूलचा धाक दाखवून ही धमकी दिली. विखे पाटलांच्या निकटवर्तीयाला अशाप्रकारे धमकी दिल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
तुषार सदाफळ असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. तर दशरथ तुपे असं तक्रारदाराचं नाव आहे. तक्रारदार दशरथ तुपे हे नगरसेवक असून विखे पाटलांचे निकटवर्तीय मानले जातात. सदाफळ याने यात्रेतील टेंडर दुसऱ्याला दिल्याच्या कारणावरून नगरसेवकाला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. राहाता शहराचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी एकत्र येत या घटनेचा निषेध केला असून तुपे यांच्या फिर्यादीवरून तुषार सदाफळ याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
advertisement
नेमकी घटना काय घडली?
राहाता नगरपरिषदेचे भाजपचे नगरसेवक दशरथ तुपे यांना तुषार सदाफळ याने फोनवरून तसेच चौकात जमाव जमवून पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी राहाता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची आणि नगरसेवक तुपे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केलीय.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहाता शहराचे ग्रामदैवत श्री विरभद्र यात्रेनिमित्त पाळण्याचे टेंडर आपल्याला दिले नाही, याचा राग मनात धरून सदाफळ याने हे कृत्य केले आहे. शिवीगाळ करत स्वतःकडील परवानाधारक बंदुकीचा धाक दाखवून तुषार सदाफळ याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नगरसेवक दशरथ तुपे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

तक्रारदार नगरसेवक दशरथ तुपे
advertisement
तुषार सदाफळ हा परवानाधारक बंदुकीच्या जोरावर नेहमीच शहरातील व्यापाऱ्यांवर दहशत निर्माण करतो. यात्रेच्या टेंडर प्रक्रियेत माझा काहीही संबंध नसताना मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने मला आणि माझ्या कुटुंबाला तुषार सदाफळ याच्यापासून धोका असल्याने त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी तुपे यांनी केली आहे. या घटनेनंतर तुषार सदाफळ हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विखे पाटलांच्या निकटवर्तीय नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राहाता तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 1:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'...तर तुला ठार करेन', विखे पाटलांच्या निकटवर्तीला थेट दाखवली पिस्तूल, नगरला हादरवणारी घटना!






