कल्याणमधील प्रमुख मार्ग 20 दिवस बंद, कारण काय? पर्यायी मार्ग कोणते?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
Kalyan Traffic: मुंबई-ठाण्याहून कल्याण डोंबिवली आणि बदलापूरकडे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक 20 दिवस बंद राहील.
कल्याण: मुंबई व ठाण्याकडून दररोज हजारो प्रवासी कल्याण-शीळफाटा मार्गाने डोंबिवली, कल्याण, बदलापूर भागात जातात. हा रस्ता प्रचंड वर्दळीसाठी आणि वाहतूक कोंडीसाठी ओळखला जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे. आता या मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.
शीळफाटा रस्त्यावरील वाहतूक विशेषतः संध्याकाळच्या वेळी येथे वाहतूक मोठ्या प्रमाणात संथ होते. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यात दरम्यान कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वेचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गाच्या कामासाठी सिमेंटचे गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एमएमआरडीएने नेमलेल्या कंत्राटदारामार्फत सोनारपाडा ते मानपाडा चौकादरम्यान हे काम केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक 10 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या 20 दिवसांच्या काळासाठी तात्पुरती वळवण्यात येणार आहे. याबाबत ठाणे वाहतूक पोलिसांनी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
advertisement
वाहतूक कुठे बंद असणार?
1. कल्याण शिळ रोडवरून कल्याणकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना मानपाडा चौक, पिलर क्र. 201 येथे प्रवेश बंद.
2. कल्याण शिळ रोडवरून कल्याणकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना डी.एन.एस. चौक, पिलर क्र. 144 येथे प्रवेश बंद.
advertisement
पर्यायी मार्ग
मानपाडा चौक मार्गावरील वाहतुकीसाठी प्रवासी मानपाडा चौक पीलर नं. 201 येथून डावीकडे वळण घेऊन सर्विस रोडने सोनारपाडा चौक पर्यंत येथून पुन्हा उजवीकडे वळण घेऊन कल्याण शिळ रोडवरून इच्छित स्थळी जातील.
डी.एन.एस. चौक मार्गावरील वाहतुकीसाठी प्रवासी डी.एन.एस. चौक पीलर नं. 144 येथून डावीकडे वळण घेऊन सर्विस रोडने सुयोग हॉटेल, अनंतम रिजन्सी चौक येथून पुन्हा उजवीकडे वळण घेऊन कल्याण रोडवरून इच्छित स्थळी जाईल.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
November 11, 2025 8:44 AM IST


