Dadar News : अनेक वर्षांपासूनचा व्यवसाय धोक्यात, मच्छिमारांना दादर सोडावं लागणार? बीएमसी मोठा निर्णय घेणार?

Last Updated:

Dadar Mulund Fish Market Relocation News : दादरमधील मच्छीविक्रेत्यांना मुलुंडमधील ऐरोली टोलनाका येथे हलवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. नेमका हा निर्णय का घेतला जात आहे या बाबत सविस्तर जाणून घेऊयात.

DadarFishVendors
DadarFishVendors
मुंबई : दादर परिसर नेहमीच वाहतूक कोंडी आणि गर्दीने भरलेला असतो. दररोज पहाटे मच्छीमारांचे येत असलेल्या ट्रकामुळे सेनापती बापट मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे महापालिकेने ठरवले आहे की दादरमधील मच्छीमारांना तात्पुरते मुलुंडमधील ऐरोली टोलनाका परिसरात हलवले जावे. लवकरच या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या तब्बाल 36 मच्छीमारांना नोटीस दिली जाणार आहे. पण मच्छीमारांनी याला विरोध करण्याची तयारी सुरू केली आहे.
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल
बाजार विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात अतिरिक्त आयुक्त विपिन शर्माच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यात मच्छीमारांना तात्पुरते ठिकाण म्हणून ऐरोली टोलनाका तसेच मुलुंड येथे जागा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. औपचारिक परवानगी अजूनही मिळालेली नसल्याने नोटीस अजून देण्यात आलेली नाही.
मच्छीविक्रेत्याचे म्हणणे नेमके आहे तरी काय?
मच्छीविक्रेता कांचन रुक्मिणो म्हणाल्या की, 2021 मध्येही अशी नोटीस आली होती. तेव्हा त्यांनी उच्च न्यायालयात तक्रार केली होती आणि त्यांना तिथेच व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली होती. आता पुन्हा हलवण्याची गरज नाही. महापालिकेने सांगितले आहे की मच्छीमारांचा कायमस्वरूपी बाजार महात्मा जोतिबा फुले मंडई परिसरात बांधला जात आहे. तो एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होईल. तोपर्यंत तात्पुरते मुलुंडमधील जागा देण्यात येईल.
advertisement
दररोज मच्छीमार ट्रकमध्ये मासळी आणून सकाळी 10-12 वाजेपर्यंत सेनापती बापट मार्गावर विक्री करतात. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात होत असते. 'चकाचक दादर' संस्थेचे संस्थापक चेतन कांबळे म्हणाले की, एल्फिन्स्टन ब्रिज बंद झाल्यामुळे या भागातील वाहतूक आणखी गंभीर झाली आहे. मच्छीमारांना रस्त्यावर विक्री करण्याची परवानगी दिली गेली, हे कळल्यावर आम्ही विरोध केला आणि तक्रार नोंदवली.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Dadar News : अनेक वर्षांपासूनचा व्यवसाय धोक्यात, मच्छिमारांना दादर सोडावं लागणार? बीएमसी मोठा निर्णय घेणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement