पुणेकरांचा वेळ वाचणार, लवकरच तिसरा डबलडेकर उड्डाणपूल, कुठून कसा असेल मार्ग?

Last Updated:

Pune News: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी असून वाहतूककोंडी कमी होणार आहे. लवकरच शहरात तिसरा डबलडेकर उड्डाणपूल होणार आहे.

पुणेकरांचा वेळ वाचणार, लवकरच तिसरा डबलडेकर उड्डाणपूल, कुठून कसा असेल मार्ग?
पुणेकरांचा वेळ वाचणार, लवकरच तिसरा डबलडेकर उड्डाणपूल, कुठून कसा असेल मार्ग?
पुणे: वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना जलद वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यात मेट्रोचे जाळे पसरवले जात आहे. या योजनेअंतर्गत पुणेकरांना लवकरच तिसरा डबलडेकर उड्डाणपूल मिळणार आहे. हा उड्डाणपूल कोथरुड डेपो येथे उभारला जाणार असून, पुणे मेट्रोच्या फेज-2 विस्ताराचा भाग आहे. उड्डाणपुलाचा विस्तार वानवडी ते चांदनी चौक या महत्त्वाच्या मार्गावर होणार आहे.
कोथरुडमध्ये नवीन डबलडेकर उड्डाणपूल
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक आणि नळ स्टॉप येथे उभारलेल्या डबलडेकर उड्डाणपुलांनी वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. याठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या यशस्वी डिझाइनचा वापर कोथरुडमधील नवीन पुलासाठी केला जाणार आहे. कोथरुडमधील हा डबलडेकर पूल पूर्ण झाल्यानंतर पौड रोड आणि चांदनी चौकाजवळील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
advertisement
वाहतूक सुविधा सुलभ करण्यासाठी कोथरुड भागात मेट्रोचा विस्तार सुरू आहे. महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले की, या भागात पुरेशी रस्ता रुंदी असल्यामुळे भूसंपादनाची कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे वाहतुकीला अडथळा न येता प्रकल्प पूर्ण करता येईल. मेट्रो मार्गाचा सुमारे 700 मीटरचा भाग आधीच बांधला गेला असून, उर्वरित 1.123 किलोमीटरचे काम अजून बाकी आहे. या प्रकल्पात एलिव्हेटेड मेट्रो व्हायाडक्ट उभारला जाणार आहे आणि कोथरुड बस डेपो तसेच चांदनी चौक येथे दोन मेट्रो स्टेशन तयार होतील. या प्रकल्पामुळे पौड रोड आणि चांदनी चौकाजवळील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांचा वेळ वाचणार, लवकरच तिसरा डबलडेकर उड्डाणपूल, कुठून कसा असेल मार्ग?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement