‘तुम्हा सगळ्यांना...’ बॉलिवूडचे ‘हि-मॅन’ धर्मेंद्र यांचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा VIDEO व्हायरल
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Dharmendra Last Post : धर्मेंद्र यांनी 2 ऑक्टोबर 2025 रोजी सोशल मीडियावर आपली शेवटची पोस्ट शेअर केली आहे. त्यांचा हा शेवटचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
Dharmendra : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. सहा दशकांपेक्षा अधिक काळ बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्यावर गेल्या 11 दिवसांपासून उपचार सुरू असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे . अशातच धर्मेंद्र यांचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धर्मेंद्र यांनी 2 ऑक्टोबर 2025 रोजी सोशल मीडियावर आपली शेवटची पोस्ट शेअर केली होती. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. धर्मेंद्र यांनी 2 ऑक्टोबर 2025 रोजी व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
धर्मेंद्र यांचा शेवटचा व्हिडीओ (Dharmendra Last Video)
धर्मेंद्र आपल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये चाहत्यांसोबत संवाद साधताना दिसून आले आहेत. आपल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये ही-मॅन म्हणत आहेत,"माझ्या सर्व भावा-बहिणींना, लहान मुला-मुलींना दसऱ्याच्या खूप-खूप शुभेच्छा. देव तुम्हाला भरपूर आयुष्य आणि आनंद देवो". धर्मेंद्र आणि बॉबी देओल यांनीदेखील धर्मेंद्र यांच्या व्हिडीओवर खास कमेंट केली होती. तसेच चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीदेखील धर्मेंद्र यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
advertisement
advertisement
धर्मेंद्र सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रत्यन करत असत. धर्मेंद्र यांचा IKKIS हा शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळं त्यांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटवरही ठेवण्यात आलं आहे. पण आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती हेमा मालिनी यांनी दिली आहे.
advertisement
धर्मेंद्र यांनी सहा दशकं प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. 'शोले', 'चुपके चुपके', 'सत्यकाम', 'सीता और गीता' यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत धर्मेंद्र यांनी काम केलं आहे. जरी त्यांनी जगाला अखेरचा अलविदा म्हटलं असलं, तरीसुद्धा ते आज, उद्या आणि कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2025 10:21 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
‘तुम्हा सगळ्यांना...’ बॉलिवूडचे ‘हि-मॅन’ धर्मेंद्र यांचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा VIDEO व्हायरल


