10 दिवसांआधी गमावली आई, काशी घाटावर रडत होते पंकज त्रिपाठी, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
पंकज त्रिपाठी काशी घाटावर आईच्या आठवणीत भावुक झाले. काशीच्या घाटावर ते रडत बसले होते. त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार पंकज त्रिपाठी नुकतेच काशी येथे दिसले. काही दिवसांधीत त्यांच्या आईचं निधन झालं. त्यांची आई श्रीमती हेमवंती गेवी यांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी ते मोक्षदायिनी नगरी वाराणसी येथे अस्थित विसर्जन आणि दान पुण्य सारख्या धार्मिक विधींसाठी आले होते. काशीच्या घाटावर ते रडत बसले होते. त्रिपाठी सोमवारच्या दिवशी ते काशीला आले होते. आईच्या आठवणीत ते भावुक झाले.
अभिनेते पंकज त्रिपाठी अस्सी घाटावरुन बोटीने जाऊन संपूर्ण श्रद्धेनं मध्य गंगेच्या पात्रात आपल्या आईच्या अस्थि विसर्जन केल्या. या क्षणी ते प्रतंड भावुक झाल्याचं पाहायला मिळाले. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते.
धार्मिक अनुष्ठान पूर्ण केल्यानंतर पंकज त्रिपाठी अस्सी घाटावर असलेल्या एका आश्रमात गेले. तिथे त्यांनी दान पुण्य करून आपल्या आईच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली. तिथे त्यांना ब्राम्हणांना जेवण, कपडे आणि दक्षिणा दिली. माझ्या आईने नेहमीच मला संस्कार आणि करुणेची धडे दिले असंही सांगितलं. आश्रमातील पंकज त्रिपाठी यांचे काही व्हिडीओ आणि फोटो समोर आलेत. या प्रसंगी पंकज त्रिपाठी यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र, सहकारी उपस्थित होते. त्यांच्या कठीण काळात शांती आणि सांत्वनासाठी आलेल्या सगळ्यांचे त्यांनी आभार मानले.
advertisement
पंकज त्रिपाठी यांच्या आईचं 2 नोव्हेंबर रोजी बिहारच्या गोपालगंज येथे निधन झालं. वयाच्या 89 व्या वर्षी दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं. त्याआधी 2023 मध्ये पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडीत बनारस तिवारी यांचं निधन झालं होतं. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2025 10:02 AM IST


